Site icon

नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

दि. नाशिक रोड देवळाली व्यापारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी ( दि.११ ) महिला गटाच्या दोन जागेंसाठी मतदान झाले. यापूर्वी सत्ताधारी सहकार पॅनलचे 19 उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विरोधी परिवर्तन पॅनलच्या एकच उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे निवडणुकीतील केवळ औपचारिकता शिल्लक आहे. सोमवारी मतमोजणी होईल. दुपारपर्यंत निकालाचा कल स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

मतदानाचा हक्क बजावताना सहकार पॅनलच्या उमेदवार रंजना बोराडे

येथील के. एन. केला शाळा, आंनद ऋषी शाळा, इच्छामणी शाळा उपनगर आदी ठिकाणच्या मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात झाली. सहकार पॅनलच्या उमेदवार रंजना बोराडे आणि कमल आढाव यांनी के एन केला शाळेत मतदानाचा हक्क बजावला. तसेच परिवर्तन पॅनलच्या संगीता गायकवाड यांनी शाळा क्रमांक १२५ येथील मतदान केंद्रावर मतदान केले. सहकार पॅनलचे नेते निवृत्ती अरिंगळे आणि दत्ता गायकवाड यांनी शाळा क्रमांक १२५ मधील केंद्रात मतदान केले. नाशिक रोड परिसरातील मतदान केंद्राच्या बाहेर दोन्हीही पॅनलच्या नेत्यांनी गर्दी दिसत होती. दरम्यान केवळ दोन जागेसाठी मतदान प्रक्रिया राबवली जात असली तरी निवडणुकीतील उत्साह कायम असल्याचे दिसत होते. सकाळच्या वेळेला ऊन कमी असल्यामुळे मतदार केंद्रावर गर्दी पाहायला मिळाली.

मतदानाचा हक्क बजावताना सहकार पॅनलच्या उमेदवार कमल आढाव

सहकारचे बिनविरोध विजयी उमेदवार 
दत्ता गायकवाड , निवृत्ती अरिंगळे, सुधाकर जाधव,मनोहर कोरडे, सुनील आडके, सुनील चोपडा, रमेश धोंगडे, प्रकाश घुगे, डॉ. प्रशांत भुतडा,श्रीराम गायकवाड, अरुण जाधव, जगन आगळे, योगेश नागरे, बाबा सदाफुले , नितीन खोले , विजय चोरडिया, वसंत अरिंगळे, गणेश खर्जुल,नितीन पेखळे

सहकारचा विजय निश्चित 

नाशिक रोड देवळाली व्यापारी बँकेचे सर्व सभासद सहकार पॅनलच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत.दोन जागेसाठी होत असलेल्या महिला गटातील उमेदवार हे सहकार पॅनलचेच विजयी होतील, असा आत्मविश्वास पॅनलचे नेते दत्ता गायकवाड आणि निवृत्ती अरिंगळे यांनी व्यक्त केला आहे.

परिवर्तन अटळ 

नाशिक रोड देवळाली मतदारसंघात सभासदांचा प्रतिसाद पाहता परिवर्तन अटळ होईल. महिला गटातील परिवर्तन पॅनलच्या उमेदवार संगीता गायकवाड यांचा विजय जवळपास निश्चित आहे , असा दावा पॅनलचे नेते हेमंत गायकवाड व अशोक सातभाई यांनी केला आहे.

मतदानाचा हक्क बजावताना परिवर्तन पॅनलच्या संगीता गायकवाड

The post नाशिकरोड व्यापारी बँकेचे मतदान शांततेत; दोन जागेंसाठी तीन उमेदवार रिंगणात appeared first on पुढारी.

Exit mobile version