नाशिकला आज अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात बुधवारी (दि.२६) अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन दिवस जिल्ह्यात पाऊस असणार असून, काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हिमालयीन भागातील बर्फवृष्टी व अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यावर पुन्हा एकदा अवकाळीचे संकट दाटले आहे. नाशिक जिल्ह्याला बुधवारी (दि.२६) ऑरेंज अलर्ट दिला आहे. या काळात वादळी वारेही वाहण्याची दाट शक्यता आहे. तर गुरुवार (दि.२७)पासून पुढील ४८ तास येलाे अलर्ट देण्यात आला आहे. या दोन दिवसांत वाऱ्यांचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, नाशिक शहर व परिसरात मंगळवारी (दि.२५) उकाड्यात प्रचंड वाढ झाली. तापमानाचा पारा थेट ३७.८ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला. त्यामुळे दिवसभर हवेत उष्मा जाणवत होता. वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिकांना घरात बसणे मुश्किल झाले होते. दुपारी १२ ते ४ यावेळेत प्रचंड उष्मा जाणवत असल्याने रस्त्यावर अघोषित संचारबंदी लागू केल्यासारखे वातावरण पाहायला मिळत होते.

हेही वाचा : 

The post नाशिकला आज अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट appeared first on पुढारी.