नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड

माळ www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधत छत्रपती सेनेने साकारलेली 21 फूट लांबीची आणि 71 फूट उंचीची विश्वविक्रमी कवड्यांची माळ पाहण्यासाठी शनिवारी (दि.18) नाशिककरांची झुंबड उडाली. छत्रपती सेनेकडून दिवसभर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

छत्रपती सेनेने यंदाच्या वर्षीही शिवजन्मोत्सव सोहळ्याची आगळीवेगळी परंपरा कायम राखली आहे. सीबीएस येथील छत्रपती शिवाजी स्मारक येथे संघटनेने 21 फुटांची कवड्यांची माळ साकारली आहे. ही माळ पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे. यावेळी माळेची भव्यता पाहून उपस्थित मंत्रमुग्ध होत असून, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय; जय भवानी, जय शिवाजी’ असा जयघोष ते करत आहेत. विश्वविक्रमी माळेचे अनावरण शुक्रवारी (दि.17) नरवीर तानाजी मालुसरे यांचे 12 वे वंशज डॉ. शीतल मालुसरे यांच्या हस्ते करण्यात आले. वंडर बुक ऑफ रेकॉर्डसने या माळेची नोंद घेतली आहे. छत्रपती सेनेकडून यानिमित्ताने मविप्रचे सरचिटणीस अ‍ॅड. नितीन ठाकरे व सह्याद्री अ‍ॅग्रो फार्मर्सचे विलास शिंदे यांना शिवसमृद्धी पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी समितीच्या अध्यक्षा शिल्पा सोनार, चेतन शेलार नीलेश शेलार, तुषार गवळी, डॉ. जयंत थविल, राजेश पवार, प्रवीण भामरे, धीरज खोळंबे, राहुल ठाकरे, संदीप निगळ, अ‍ॅड. विद्या चव्हाण, पूजा खरे, प्रिया कुमावत, धनश्री वाघ, सुनीता जाधव, सविता शिंदे, सविता जाधव, वंडर बुक ऑफ रेकॉर्डच्या अमी छेडा यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. माळेची आज मिरवणूक : छत्रपती सेनेने यापूर्वी छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा विश्वविक्रमी जिरेटोप, भवानी तलवार, कट्यार व वाघनखे तसेच टाक यांची प्रतिकृती साकारली. यंदा भव्यदिव्य अशी कवड्यांची माळ साकारली आहे. रविवारी (दि.19) पारंपरिक मार्गावरून या माळेची मिरवणूक काढण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिकला कवड्यांची माळ पाहण्यासाठी झुंबड appeared first on पुढारी.