नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित

अकरावी प्रवेश प्रक्रिया www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरात इयत्ता अकरावीच्या केंद्रिभूत प्रवेशप्रक्रियेंतर्गत राबविण्यात येणार्‍या दुसर्‍या फेरीची मुदत बुधवारी (दि.17) संपली असून, सायंकाळी 6 पर्यंत 2,228 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. या फेरीत 8.41 टक्के प्रवेश निश्चित झाले आहेत. पहिल्या दोन फेर्‍यांमध्ये आतापर्यंत 11 हजार 799 जागांवर विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. अद्यापही 14 हजार 681 जागा रिक्त आहेत.

शहरातील 63 महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावीच्या 26 हजार 480 जागा असून, 27 हजार 732 विद्यार्थ्यांचीच नोंदणी झाली आहे. पहिल्या फेरीसाठी 12 हजार 623 विद्यार्थ्यांपैकी 9 हजार 462 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. तर दुसर्‍या गुणवत्ता यादीसाठी तब्बल 8 हजार 180 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता. या यादीसाठी चार हजार 36 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी दोन हजार 228 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. येत्या गुरुवारी (दि.18) तिसर्‍या फेरीसाठी उपलब्ध होणार्‍या रिक्त जागांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानंतर पसंती क्रमांक नोंदविण्यासह नवीन विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग एक भरण्याची मुदत देण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात तिसरी गुणवत्ता यादी प्रसिद्ध होणार आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : अकरावीच्या दुसर्‍या फेरीत 2,228 प्रवेश निश्चित appeared first on पुढारी.