नाशिक : अडीचशे वर्षांची परंपरा असलेले गोदाघाटावरील ‘एकमुखी दत्तमंदिर’

एकमुखी दत्त मंदिर नाशिक,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

गोदाघाटावरील एकमुखी दत्तमंदिराला अडीचशे वर्षांची परंपरा आहे. या प्राचीन मंदिरात रोज हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

मंदिराची स्थापना अडीचशे वर्षांपूर्वी झाली. वामन महाराज हे दत्तात्रेयांचे भक्त होते. दत्त महाराजांनी दृष्टांत दिल्यानंतर त्यांनी दत्ताचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मंदिराच्या स्थापनेआधी त्या जागेवर पडके घर मठाच्या रूपात हाेते. मंदिराला लागणारे बांधकामाचे साहित्य वाळू, विटा, पाणी हे सर्व तांब्याच्या भांड्यात आणून सोवळ्यात राहून संपूर्ण कुटुंबाने हे बांधकाम केले. सर्व पूजाविधी करत या मंदिराची प्रतिष्ठापना केली. सुरुवातीच्या काळात या मंदिरात फारसे कोणी येत जात नव्हते. परंतु काही काळानंतर लोकांना जशी प्रचिती येत गेली, तशी मंदिरात भक्तांची गर्दी वाढायला लागली. आता दररोज हजारोंच्या संख्येने भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. या मंदिरात दररोज मोठ्या प्रमाणात अन्नदानही केले जाते.

दत्तजयंतीनिमित्त होणारे कार्यक्रम

दि. ३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबरदरम्यान नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रवचन, कीर्तन, तबला वादन, वीणा वादन यासारखे कायर्क्रम होणार आहेत. दत्तजयंतीच्या दिवशी पहाटे ५ वाजता लघुरुद्राभिषेक करून दत्ताच्या मूर्तीला महावस्त्र परिधान केले जाते. त्यानंतर आरती केली जाते. सायंकाळी ६.३० वाजता प्रदोष दत्तजन्म उत्सव साजरा केला जातो.

मंदिराला गादी परंपरा

या मंदिराला गुरू-शिष्याची म्हणजेच गादी परंपरा आहे. वामन महाराजांनी समाधी घेतल्यानंतर त्यांची सातवी पिढी मयूरेश बर्वे हे सध्या या मंदिराचा संपूर्ण कारभार बघत आहेत.

हेही वाचा :

The post नाशिक : अडीचशे वर्षांची परंपरा असलेले गोदाघाटावरील 'एकमुखी दत्तमंदिर' appeared first on पुढारी.