नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला

म्हसरूळ नराधम www.pudhari.news

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

पंचवटीतील द किंग फाउंडेशन संचलित ज्ञानपीठ गुरुकुल निवासी वसतिगृहाचा संचालक हर्षल मोरे याने सहा मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली होती. त्यानुसार त्याच्यावर वेगवेगळे सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता यात आणखी एक फिर्यादी पुढे आल्याने गुन्ह्यांची संख्या वाढली आहे. माणुसकीला काळिमा फासणार्‍या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली असून, नववीला शिक्षण सोडून गेलेली एक अल्पवयीन मुलगी बुधवारी (दि. 30) समोर आली आहे. यामुळे या गुन्ह्यांची व्याप्ती वाढली असून, आता अल्पवयीन सहा मुली व एक सज्ञान अशा सात मुली ‘त्या’ नराधमाच्या शिकार झाल्या आहेत.

आदिवासी संघटनेचा मिळाला पुढाकार…
पहिल्या तक्रारदार मुलीने अत्याचार होत असल्याबाबत चुलत बहिणींना कळविले. पीडितेच्या बहिणींनी हा प्रकार आदिम संघर्ष समन्वय समिती या संघटनेतील सामाजिक कार्यकर्त्यास सांगितला. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना सहकार्य करीत आदिवासी संघटनांनी पुढाकार घेत अजून काही आदिवासी मुलींवर अत्याचार झाला आहे का? याचा शोध घेण्यास सुरुवात केली. यात त्यांना यश मिळाले असून, गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अत्याचार पीडितांचा आकडा पुन्हा वाढला appeared first on पुढारी.