नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांकडून तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड वसूल

अवैध वृक्षतोड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरात विनापरवानगी वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच सात लाख ५५ हजार रुपयांचा दंडही आकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका येथील ओम सर्व्हिस स्टेशन पंप, मयूर गॅस एजन्सी, सर्वांगी साडी सेंटर तसेच बांधकाम विभागाच्या ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्षतोड करणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचा इशारा दिला आहे. नागरिकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्षतोडीसाठी मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडून रीतसर परवानगी घ्यावी, अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उपआयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

हेही वाचा : 

The post नाशिक : अनधिकृत वृक्षतोड करणाऱ्यांकडून तब्बल 'इतक्या' लाखांचा दंड वसूल appeared first on पुढारी.