नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे

भगूर www.pudhari.news

भगूर : पुढारी वृत्तसेवा

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण देशात केंद्र सरकारच्या माध्यमातून स्वातंत्र सैनिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे देशाचे केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात 38 स्वातंत्र्य सैनिकांचा शाल सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

व्यासपीठावर खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, आमदार डॉ. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी डी.गंगाधरण, लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, सचिन ठाकरे, तानाजी करंजकर, प्रसाद आडके, तानाजी भोर, कैलास गायकवाड, निलेश हासे भगूरच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड, पालिका अधीक्षक रमेश राठोड रमेश, माधुरी कांगणे, रेल्वेचे अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पदवी मिळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे शिफारस करणार असल्याचे केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले. तसेच भगूर येथे केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते स्वतंत्र्य सैनिकांचा सन्मानसोहळा पार पडल्यानंतर स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोसत्व वर्षानिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबार भेट देणार असून या सर्व सैनिकांचा प्रवास खर्च  रेल्वे करणार असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

हेही वाचा:

The post नाशिक : अमृतमहोत्सवनिमित्त 75 स्वातंत्र्यसैनिक अंदमान निकोबारला भेट देणार; त्यांचा खर्च रेल्वे करणार: ना.दानवे appeared first on पुढारी.