Site icon

नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न केल्यास आंदोलन – मनसे नेते संतोष पिल्ले

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

जेलरोड परिसरातील साडेसहा एकरमध्ये अमृत उद्यान विकसित झाले आहे. मागील काही दिवसांपासून उद्यानातील चंदनाची वृक्ष चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडतांना दिसत आहे. त्याचप्रमाणे येथील उद्यानाची दुरावस्था झाल्याचे दिसते. याप्रश्नी महापालिका प्रशासन दुर्लक्ष करताना दिसते. येत्या आठ दिवसात येथील समस्यांची सुटका झाली नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन करू असा इशारा नाशिक जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सरचिटणीस संतोष पिल्ले यांनी दिला आहे.

अमृत उद्यान जेलरोड परिसरातील सर्वात मोठे उद्यान आहे. येथे मोठ्या संख्येने लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येत असतात.परंतु मागील काही दिवसांपासून उद्यानातील खेळण्या मोडकळीस आलेल्या दिसतात. तसेच येथील काही शोभिवंत फुल झाडांची नासधूस झालेली दिसते. उद्यानाच्या संरक्षणासाठी असलेल्या तारा देखील काही ठिकाणी तुटलेल्या दिसत आहेत. सुरुवातीला उद्यानाची वेळ ही ठराविक होती. दुपारच्या सुमाराला उद्यान बंद केले जात होते, त्याचप्रमाणे येथे वॉचमन देखील होता. त्यामुळे उद्यानाची देखभाल नियमितपणे केली जात होती. परंतु काही दिवसांपासून येथे वॉचमन दिसत नाही, संरक्षणासाठी असलेल्या ताराही तुटलेल्या आहे, त्यामुळे काही टवाळखोर दुपारच्या सुमाराला उद्यानात येत असतात, काही युवक आणि युवती देखील उद्यानात फिरताना दिसतात, या समस्यांची महापालिका प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अन्यथा मोठे आंदोलन करू असा इशारा मनसेचे संतोष पिल्ले यांनी दिला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अमृत उद्यानातील समस्या दूर न केल्यास आंदोलन - मनसे नेते संतोष पिल्ले appeared first on पुढारी.

Exit mobile version