नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास शिक्षा

अल्पवयीन मुलीचा विनयभंग,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
अल्पवयीन मुलीचा विनयभंग करीत तिला धमकावणार्‍यास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व सात हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. शुभम अशोक जाधव (19, रा. समतानगर, उपनगर) असे या आरोपीचे नाव आहे.

शुभमने 19 जानेवारी 2018 रोजी सायंकाळी दीपनगर येथील ड्रीम रॉयल इमारतीजवळ पीडित मुलीचा विनयभंग केला होता. शुभमने एकतर्फी प्रेमातून पीडितेवर दबाव टाकला त्याने पीडितेचा पाठलाग करून, माझ्याशी प्रेम कर नाहीतर मी तुला कुणाचीच होऊ देणार नाही तसेच चेहर्‍यावर अ‍ॅसिड टाकण्याची व आई-वडिलांचा बेत पाहतो, अशी धमकी दिली होती. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात शुभमविरोधात विनयभंगासह पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपनिरीक्षक संध्या तेली यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी पाच साक्षीदार तपासले. आरोपी शुभमविरोधात गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपीला सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणार्‍यास शिक्षा appeared first on पुढारी.