Site icon

नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

दमदाटी, धमकावत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणाऱ्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. प्रवीण प्रकाश किरवे (२२, रा. जेलरोड) असे आरोपीचे  नाव आहे.

पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवीणने जुलै ते ऑगस्ट २०१६ या कालावधीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. पीडितेस जिवे मारण्याची धमकी देत ओमनगर व नांदूरनाका येथे अत्याचार केले होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर पीडितेच्या आईने पोलिसांकडे प्रवीणविरोधात पोक्सोसह बलात्काराची फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी सात साक्षीदार तपासले. प्रवीणविरोधात परिस्थितिजन्य पुरावे व साक्षीदार यांच्या आधारे गुन्हा शाबित झाल्याने न्यायाधीश व्ही. एस. रेड्डी यांनी प्रवीणला जन्मठेप व 10 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अल्पवयीन मुलीवर अत्याचाराबद्दल जन्मठेप appeared first on पुढारी.

Exit mobile version