Site icon

नाशिक : अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; घराचे पत्रेही उडाले

चापडगाव : पुढारी वृत्तसेवा
सिन्नर तालुक्याच्या पश्चिम भागातील चापडगाव येथे रविवारी (दि.16) सायंकाळी 5 वाजता सुमारास वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस झाला. या पावसाने शेतमालाचे व घरांचे मोठे नुकसान केले आहे. वादळी वार्‍यामुळे भाऊसाहेब निवृत्ती सांगळे यांच्या घरासमोरील पडवीवरील पत्रे उडून गेले. झालेल्या नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करावे व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्‍यांकडून होत आहे.

चापडगाव : घराच्या पडवीतील उडालेले पत्रे.

कांदा बियाणांची नासाडी; आर्थिक भुर्दंड
तसेच परिसरातील झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. सीताराम दगडू आव्हाड शेती पिकावरील टोमॅटो, काढणीला आलेला कांदा, तयार झालेले होणारे कांद्याची बियाण्याचे नुकसान झाले. यांचे उन्हाळ बाजरीचेदेखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अवकाळीमुळे पिकांचे नुकसान; घराचे पत्रेही उडाले appeared first on पुढारी.

Exit mobile version