नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री

बार www.pudhari.news

नाशिक (सुरगाणा) : पुढारी वृत्तसेवा

सुरगाणा तालुक्यातील अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी ग्रामीण भागात खुलेआम या मद्याची विक्री सुरू आहे.

तालुक्यात 60 रुपयांची देशी मद्याची बाटली 100 रुपयांना तर 140 ची इंग्लिश 200 रुपयांना विक्री होत आहे. तालुक्यातील विविध ढाब्यांवर या मद्याच्या बाटल्या सर्रास मिळत आहेत. सुरगाणा तालुक्यातील मद्य तस्करी ही ग्रामीण भागातील परिसरात अलिशान वाहनाने अवैधरीत्या राजरोसपणे विक्री होत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ दिवसभर काबाडकष्ट करुन मजुरीचे पैसे मद्यात उडवत असल्याचे प्रकार सुरु आहेत. परिणामी येथील कुटुंब रस्त्यावर येत असून घरोघरी महिला मेटाकुटीस आल्या आहेत. अवैध मद्य दुकानावर ग्राहकांची गर्दी वाढल्याने अवैध विक्रेत्यांनी दर दुपटीने वाढविले आहेत. खेड्यावर दुधाची पिशवी मिळणार नाही पण मद्याची बाटली हमखास मिळत आहे. खेडोपाडी अवैध मद्याच्या बाटल्यांनी भरलेली खोकी पोचविण्यासाठी स्वतंञ यंञणा देखील कार्यरत आहे. काही खेड्यांवर सायंकाळी उशिरा किंवा पहाटे मद्याची खोकी घरपोच पोहचवली जात आहेत. अवैध दारुविक्री करणारे पहाटेच ठरलेल्या दुकानावरुन खोके खरेदी करतात व  गावी जाऊन चढ्या भावाने विक्री करत आहेत. या गोरखधंद्दावाल्यांची तक्रार करायला धजावल्यास त्यालाच दमदाटी करण्यापर्यंत मद्यविक्री करणाऱ्यांची मजल केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : अवैधरित्या मद्य विक्रीला ब्रेक लागण्याऐवजी खुलेआम विक्री appeared first on पुढारी.