नाशिक : अशोकस्तंभ-जेहान सर्कल; सायकल ट्रॅकसाठी चाचणी

सायकल ट्रॅक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
केंद्र सरकारच्या सायकल फॉर चेंज चॅलेंजमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत अशोकस्तंभ – जेहान सर्कल – पाइपलाइन रोड – महिंद्रा सर्कल असा 16 किमी (दोन्ही बाजूने) पॉपअप सायकल ट्रॅक तयार करण्याचा प्रस्ताव आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात अशोकस्तंभ ते जेहान सर्कल या 6.4 किमी मार्गावर चाचणी झाली.

सायकल ट्रॅक तयार करताना रस्त्यालगत (कॉरिडॉर व नेबरहूड) येणार्‍या रस्त्यांवर सायकल ट्रॅक गरजेचा आहे. त्यामुळे अशोकस्तंभ ते जेहान सर्कल या मार्गावर चाचणी घेण्यात आली. नाशिक स्मार्ट सिटीसोबत नाशिक सायकलिस्ट्स फाउंडेशनची टीम ही चाचणीदरम्यान सोबत होती. या रस्त्यावर सायकलिस्ट्सने आणि काही ठिकाणी वाहतूक, पार्किंग व ड्रेनेजच्या ढाप्यामुळे अडथळे येत असल्याची बाब समोर आली. पॉपअप ट्रॅकदरम्यान सायकलिस्ट्सना कोणत्या अडचणी येतात, हे जाणून घेण्यासाठी हँडलबार सर्वेक्षणासारखे उपक्रम राबविण्यात आले. पोलिस उपआयुक्त संजय बारकुंड यांनी स्मार्ट सिटीमार्फत राबविल्या गेलेल्या ‘सायकल ट्रॅकसाठी रस्त्याची चाचणी’ या मोहिमेबद्दल समाधान व्यक्त केले. दत्तात्रेय चकोर, जगन्नाथ पवार, रामदास सोनवणे, अमोल भंटुरे, उल्हास कुलकर्णी, अनिल राऊत, सतीश महाजन, संतोष चापोरकर, तृप्तीदा काटकर, यामिनी नटाळ, जगन्नाथ पवार, सुवर्णा कंगाने, शुभांगिनी भुजबळ तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी दुर्गेश ओझरकर, निखिल भोईर, सूरज सूर्यवंशी, माधुरी जावळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : अशोकस्तंभ-जेहान सर्कल; सायकल ट्रॅकसाठी चाचणी appeared first on पुढारी.