नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा

www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा
शिवसेनेसाठी सध्याचा काळ हा कसोटीचा आहे. येणार्‍या निवडणुकांमध्ये निष्ठावान शिवसैनिकांना उमेदवारी देण्याचे पक्षाचे धोरण असल्याचे प्रतिपादन दिंडोरी विभागाच्या लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी केले.

शिवसैनिकांचे मत जाणून घेण्यासाठी दिंडोरी लोकसभेचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे व जिल्हाप्रमुख सुनील पाटील, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संवाद दौर्‍यात आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकांविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. निवडणुकीत इच्छुक असणार्‍या शिवसैनिकांची यावेळी मते जाणून घेण्यात आली. जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, बूथप्रमुख, गटप्रमुख यांना पक्षाने ठरवून दिलेल्या पद्धतीप्रमाणे काम झाले पाहिजे. शिवसेनेसोबत असलेली निष्ठा, जनमानसातील प्रतिमा याबाबींचा विचार करून पक्षपातळीवर उमेदवारी निश्चित करण्यात येणार आहे व प्रामाणिक शिवसैनिकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही, असे दिंडे यांनी सांगितले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले, सहकार नेते सुरेश डोखळे उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, विलास निरगुडे, उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी मानले. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, उपतालुकाप्रमुख विश्वास गोजरे, युवा जिल्हाप्रमुख नदीम सय्यद, डॉ. विलास देशमुख, उत्तम जाधव, शिवराज गोडसे, जगन सताळे, दीपक जाधव, दशरथ खराटे, मोहन जाधव आदी शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते.

जोमाने कामाला लागा : देवळ्यात पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी संवाद
आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला सुरुवात करावी, असे आवाहन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांनी आज येथे केले. देवळा येथे मंगळवारी दिंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान व संवाद दौर्‍यानिमित्त शासकीय विश्रामगृहावर शिवसेनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख कुणाल दराडे, महिला जिल्हा संघटक भारती जाधव उपस्थित होते. उपजिल्हा संघटक सुनील पवार, उपजिल्हा प्रमुख देवानंद वाघ, तालुकाप्रमुख बापू जाधव, उपतालुका प्रमुख, विभागप्रमुख, उपशहरप्रमुख, युवा सेना तालुका अधिकारी, शहर अधिकारी व महिला आघाडी तसेच आजी-माजी तालुका व शहर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : आगामी निवडणुकीत निष्ठावंतांनाच उमेदवारी ; शिवसेनेचा दिंडोरी येथे संवाद दौरा appeared first on पुढारी.