नाशिक : आणि… अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली

mayat olkh www.pudhari.news

दिंडोरी : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील वरवंडी येथे शनिवारी, दि.19 सायंकाळी सापडलेल्या बेवारस प्रेताची ओळख पटविण्याचे अत्यंत अवघड काम दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अरुण आव्हाड यांच्या चाणाक्ष व संवेदनशील वृत्तीमुळे अवघ्या तीन तासात शक्य झाले आहे.

आव्हाड यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून वरवंडी येथील महावीर पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्रवेशव्दाराजवळ एका अज्ञात पन्नास वर्षीय इसमाचे प्रेत बेवारस स्थितीत असल्याची खबर दिंडोरी पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच अरुण आव्हाड हे तत्काळ घटनास्थळी रवाना झाले. त्यांनी बेवारस प्रेत पाहिले असता त्याची ओळख पटण्यासारखी कुठली वस्तू आढळून आली नाही. आव्हाड यांनी ग्रामस्थांच्या मदतीने सदर बेवारस प्रेत ग्रामस्थांच्या मदतीने नाशिक जिल्हा रुग्णालयात हलवले. त्याठिकाणी पुन्हा एकदा प्रेताची पाहणी केली असता मयताच्या उजव्या हातावर काहीतरी गोंदले असल्याचे चाणाक्ष आव्हाड यांच्या लक्षात आले. परंतु, मयताच्या शरीराला माती लागलेली असल्याने अक्षरे व्यवस्थित वाचता येत नव्हते आव्हाड यांनी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने हात स्वच्छ धुऊन पुन्हा एकदा वाचण्याचा प्रयत्न केल्यानंतर तोकडे असल्याचे त्यांच्या लक्षात आले व तोकडे हे आडनाव कोणत्या गावाला आहे. याची खातरजमा केली असता, अरुण आव्हाड यांनी १८ वर्षांपूर्वी घोटी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असल्याने घोटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत या आडनावांची बरेच लोक देवळे या गावी राहत असल्याचे आव्हाड यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता तेथील माजी सरपंच रघुनाथ तोकडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला व मयताचे फोटो त्यांना पाठवल्यावर तो त्यांच्या गावातील इसम रतन येसू तोकडे असल्याचे समजले सदर मयत यास पत्नी सुरेखा व मुलगा रोहित मुलगी असल्याची माहिती मिळाली असून त्याला दारूचे व्यसन होते. तो म्हसरूळ येथे आपल्या बहिणीकडे आल्याची खात्रीलायक माहिती मिळाली त्यावरून अवघ्या तीन तासात अनोळखी बेवारस प्रेताची ओळख पटवण्यात आव्हाड यांना यश आले आहे. त्यांच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून दिंडोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा:

The post नाशिक : आणि... अज्ञात मयताची ओळख अवघ्या तीन तासात पटली appeared first on पुढारी.