नाशिक : आता दळणही महागले….

दळण www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दिवाळी सणानंतर दळणाचे भाव वधारणार आहे. गेल्या पाच वर्षात एकदाही दरवाढ झाली नसल्याने ही दरवाढ निश्चित मानली जात आहे.

वाढते वीजबील, साधन सामग्रीच्या देखभाल दुरूस्तीचा वाढता खर्च यांचा विचार केला गेल्या दळणाचे भाव वाढणार आहे. भाववाढीनंतर सध्या गहू, बाजरी आणि ज्वारीचे प्रती किलो पाच रुपये असलेले दर हे एक रुपयाने वाढून सहा रुपये होणार आहे, अशी माहीती नाशिकशहर पीठ गिरणी मालक संघाचे अध्यक्ष धनुशेठ खैरनार यांनी दिली. दरम्यान, सध्या सर्वच ठिकाणी वाढत असलेली महागाई हा सर्वसामान्यांसाठी चिंतेचा विषय आहे. त्यातच आता दळणाची होत असलेली दरवाढ याची त्यात भर पडत आहे. सध्या सर्व डाळी, रवा, तांदूळ, भाजणी, पापडाची नागली यांचे दर प्रती किलो सहा रुपये आहे. मिरची, हळद यांचे दर प्रती किलो 35 रुपये आणि मसाला आणि खोबऱ्याचा मसाला यांचा दर प्रती किलो चाळीस रुपये एवढा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आता दळणही महागले.... appeared first on पुढारी.