नाशिक : आता विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर, लवकरच जिल्हा परिषदेचे एफएलएन वेध ॲप

एफएलएन अॅप,www.pudhari.news

नाशिक : वैभव कातकाडे
खासगी संस्थांकडून शिक्षण क्षेत्रात ॲपचा वापर मोठ्या प्रमाणावर होत असला तरी शासकीय विभागदेखील यात कुठेही मागे नसल्याचे दिसून येत आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे नाशिक जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून साकार झालेले एफएलएन वेध ॲप. या ॲप्लिकेशनद्वारे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर मिळणार आहे. पालघर येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी या ॲपचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत बदल त्यांनी घडवून आणले होते. याचाच सकारात्मक परिणाम नाशिक जिल्हा परिषदेत राबवून राज्यभर हा प्रकल्प राबविण्यासाठी शिक्षण विभागातर्फे राज्य शासनाला प्रस्ताव पाठविला असल्याचे जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल यांनी सांगितले.

‘संख्यानिहाय मूलभूत साक्षरता’, या संकल्पनेवर आधारित एक ॲप जिल्हा परिषदेच्या नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी विकसित केले आहे. विद्यार्थी-शिक्षक आणि शाळा यांचा इत्थंभूत तपशील ठेवणारे अद्ययावत ॲप राज्यभरातील शिक्षण व्यवस्थेत अमलात येणार आहे. त्या अगोदर नाशिकमध्ये ‘पायलट प्रोजेक्ट’व्दारे हे ॲप अमलात आणावे, असा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या नव्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सर्वशिक्षा अभियानाकडे दिला आहे. पालघर जिल्ह्यात सहायक जिल्हाधिकारी म्हणून मित्तल यापूर्वी कार्यरत होत्या. तेथील आदिवासी विद्यार्थ्यांची शैक्षणिक पटावरील पीछेहाट बघून त्यांनी अत्यंत संवेदनशीलपणे ‘फाउंडेशन लिटरसी अँड न्यूमरसी’ तथा ‘एफएलएन-वेध’ या नावाने ॲप विकसित केले होते. या ॲपव्दारे कार्यक्षेत्रातील सर्व शाळांमधील प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक शिक्षक आणि प्रत्येक शाळेचा इत्थंभूत तपशील प्रोफाइलला अपलोड केला आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक विद्यार्थ्याचा आरोग्यविषयक सूक्ष्म तपशीलदेखील त्यावर अपलोड करण्यात आला आहे. या ॲपच्या ट्रॅकिंगव्दारे नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा तपशील विषयनिहाय अद्ययावत ठेवला जाणार आहे. आधारकार्ड ज्याप्रमाणे नागरिकांचा इत्थंभूत तपशील दर्शविते त्याप्रमाणे हे ॲप विद्यार्थ्याचा सर्व पट निरीक्षकांसमोर मांडू शकेल. याव्दारे शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्यास मदत होणार असल्याची माहिती सीईओ आशिमा मित्तल यांनी दिली.

असे करेल काम
ॲपमध्ये चार लॉग इन देण्यात आलेले आहे. शिक्षक, शाळा, डॉक्टर आणि ॲडमीन. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांचा डेटा वेळोवेळी अपलोड करतील, त्यानुसार त्यांना विद्यार्थ्याची प्रगती समजेल. यातील माहिती तुलनात्मक असल्याने विद्यार्थी कुठे कमी पडतोय का ते लक्षात येईल. त्यामुळे महत्त्वाच्या बाबींवर फोकस करता येईल. ॲडमीन म्हणून लॉग इन असलेले अधिकारी सर्व माहिती घेऊन शाळांना योग्य सूचना करू

हेही वाचा :

The post नाशिक : आता विद्यार्थ्यांची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर, लवकरच जिल्हा परिषदेचे एफएलएन वेध ॲप appeared first on पुढारी.