नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण

आमदार नीलेश लंके,www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक-सिन्नर एल अ‍ॅण्ड टी फाट्याजवळ ट्रकने धडक दिलेल्या दुचाकीचालकास पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी रुग्णवाहिकेची वाट न बघता स्वत: वाहनाने रुग्णालयात दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले. निफाड तालुक्यातील धारणगाव (वीर) येथील कल्याण शिवाजी सानप (42) दुचाकीने नाशिकहून येत असताना एल अ‍ॅण्ड फाटा परिसरात समोरून येत असलेल्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात सानप यांच्या डोक्याला व पायाला गंभीर मार लागला. यावेळी नाशिकहून पारनेरला जात असलेले आमदार निलेश लंके हे पाठीमागून येत होते. अपघात झाल्याचे बघताच यांनी वाहन थांबवत दुचाकीचालकाला धीर दिला.

मिरज : तीन सावकारांवर गुन्हा दाखल

यावेळी आमदार लंके यांनी सिन्नर येथील माजी नगरसेवक हर्षद देशमुख यांना फोन करून अपघाताची माहिती दिली. देशमुख यांना सिन्नरमधील चांगल्या रुग्णालयाची विचारपूस करून आमदार लंके यांनी अपघातग्रस्ताला आपल्या वाहनामध्येच घेऊन थेट रुग्णालयात आणले. देशमुख हेही तत्काळ रुग्णालयात पोहचवत त्यांनी अपघातग्रस्ताला उपचारासाठी दाखल केल्याने त्याचे प्राण वाचले.

यावेळी आमदार लंके हे संपूर्ण उपचार व अपघातग्रस्ताला शुद्ध येईपर्यंत जवळपास 2 तास रुग्णालयात थांबून असल्याचे बघायला मिळाले. नंतर रुग्णाच्या तब्बेतीची चौकशी करून त्यांनी त्याचा निरोप घेतला. फोन केल्यावर तत्काळ रुग्णाच्या मदतीसाठी धावून आलेल्या माजी नगरसेवक देशमुख यांचेही आ. लंके यांनी कौतुक केले. अपघातग्रस्तानेही आ. लंके व देशमुख यांचे आभार व्यक्त केले.

हेही वाचा  :

The post नाशिक : आमदार निलेश लंके आले धाऊन! वाचवले अपघातग्रस्ताचे प्राण appeared first on पुढारी.