नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात

लाचखोर आरोग्य अधिकारी जाळ्यात,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकार्‍याकडून बिल मंजुरीच्या मोबदल्यात 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आरोग्य विभागाचे नाशिक विभागाचे मुख्य प्रशासकीय अधिकारी गजानन मारोतराव लांजेवार यांना पकडले आहे. बुधवारी (दि.24) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

शालिमार येथील संदर्भ सेवा रुग्णालयाच्या आवारातील आरोग्य उपसंचालक कार्यालयातील मुख्य पान प्रशासकीय अधिकारी म्हणून लांजेवार नाशिक विभागाचे कामकाज हाताळत होते. त्यानुसार नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार व अहमदनगर जिल्ह्यांमधील प्रशासकीय कामकाज त्यांच्या देखरेखीखाली होते. विभागातील एक वैद्यकीय अधिकारी सेवानिवृत्त झाल्याने त्यांनी सेवानिवृत्तीनंतरच्या रजा रोखीकरणाचे बिल मंजूर करण्यासाठी लांजेवार यांच्याकडे अर्ज केला होता. मात्र, बिल मंजुरीच्या मोबदल्यात लांजेवार यांनी 20 हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराने मंगळवारी (दि.23) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली. त्यानुसार विभागाने तक्रारीची शहानिशा करून बुधवारी (दि.24) लांजेवार यांच्या कार्यालयातच सापळा रचला. लांजेवार यांनी तक्रारदाराकडून 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. त्यांच्या विरोधात भ—ष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात येत आहे.

हेही वाचा :

The post नाशिक : आरोग्यचे मुख्य प्रशासकीय अधिकारी लाच घेताना जाळ्यात appeared first on पुढारी.