नाशिक : आरोग्यसेवा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा : ना.डॉ. भारती पवार

bharti pawar www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबरपर्यंत सेवा पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सेवा पंधरवडा यशस्वी करण्यासाठी समर्पित भावनेतून आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकापर्यंत आरोग्य सेवेचा लाभ पोहोचवावा, असे आवाहन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केले.

जिल्हा शासकीय रुग्णालयात आयोजित शिबिराचे उद्घाटन करताना ना. डॉ. पवार बोलत होत्या. कार्यक्रमास आमदार देवयानी फरांदे, आरोग्य उपसंचालक डॉ. रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, शासकीय पदव्युत्तर महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. के. झा, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्यसंपर्क डॉ. सुनील राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, रुग्णालय अधिसेविका वंदना वाघ आदी उपस्थित होते. ना. डॉ. पवार म्हणाल्या, कोरोना काळात डॉक्टर व शास्त्रज्ञांनी केलेल्या यशस्वी कामगिरीमुळे आपला देश जगासाठी दिशादर्शक ठरला आहे. या सेवा पंधरवड्यांतर्गत जिल्ह्यात एकाच दिवशी 12 शासकीय रुग्णालयांमध्ये रक्तदान शिबिरे, 105 ठिकाणी नेत्ररोग तपासणी व औषधोपचार शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. या आरोग्य मेळाव्यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभ देण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आरोग्यसेवा लाभ प्रत्येकापर्यंत पोहोचवा : ना.डॉ. भारती पवार appeared first on पुढारी.