नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

ईडी कारवाईविरोधात कॉंग्रेसचे आंदोलन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
दि नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून सुरू असलेल्या चौकशीविरोधात मंगळवारी (दि.26) नाशिक शहर (जिल्हा) काँग्रेसच्या वतीने प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. पक्षाध्यक्षांवरच कारवाईचा बडगा उगारल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

‘सोनिया गांधी जिंदाबाद’, ‘मोदी सरकार मुर्दाबाद’, ‘जब जब मोदी डरता है, ईडी को आगे करता है’ आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. भाजपप्रणीत केंद्र सरकारकडून शासकीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून विरोधकांवर दबाव टाकला जात आहे. त्या माध्यमातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. गांधी परिवाराने अनेक संकटांचा सामना केला आहे. सोनिया गांधी या कधीही ईडीच्या कारवाईला भीक घालणार नाही, अशा भावना पदाधिकार्‍यांनी व्यक्त केल्या.

यावेळी प्रदेश प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक शाहू खैरे, राहुल दिवे, वत्सला खैरे, सुरेश मारू, अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर काळे, ज्येष्ठ नेते राजेंद्र बागूल, लक्ष्मण जायभावे, आशा तडवी, उध्दव पवार, दिनेश उन्हवणे, हनिफ बशीर, स्वप्निल पाटील, जावेद पठाण, सोमनाथ मोहिते, अशोक शेंडगे, अरुण दोंदे, वसंत ठाकूर, गौरव सोनार, ईशाक कुरेशी, समीना पठाण, एलिझा बेथ, आशा मोहिते आदी उपस्थित होते.

The post नाशिक : ईडी कारवाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन appeared first on पुढारी.