नाशिक : एनडीएसटी ची निवडणुक १५ ऑक्टोबरला

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूका

सिडको : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा उपनिबंधक यांनी स्थगित केलेल्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. यामध्ये नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी ची निवडणुक दि. १५ ऑक्टोबरला तर मतमोजणी दि .१६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

राज्यातील पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे सहकार विभागाने १५ जुलै रोजी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी ची निवडणुक पुढे ढकलण्यात आली होती. शासनाने आता निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला होता. अखेर जिल्हा उपनिबंधक यांनी नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स ॲण्ड नॉन टिचींग एम्प्लॉई क्रेडीट सोसायटी अर्थात एनडीएसटी ची निवडणुक दि .१५ ऑक्टोबरला तर मतमोजणी दि .१६ ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे जाहीर केले आहे. निवडणुक तारीख जाहीर झाल्याने तीन ही पॅनलने प्रचाराला वेग घेतला आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : एनडीएसटी ची निवडणुक १५ ऑक्टोबरला appeared first on पुढारी.