नाशिक : एनडीएसटी निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलची पुन्हा बाजी

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या एनडीएसटी सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलने 20 जागांवर विजय मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी परिवर्तन पॅनल आणि टीडीएफ/डीसीपीएस या प्रत्येकी 12 जागा लढविणार्‍या पॅनलला अवघ्या एका जागेवर विजय मिळाला आहे.

डीसीपीएस पॅनलने झालेल्या मतविभाजनामुळे परिवर्तन पॅनलला फटका बसल्याच्या भावना अनेक सभासदांनी व्यक्त केल्या. निकालानंतर विजयी उमेदवारांचे कार्यकर्ते यांनी मतदान केंद्रांबाहेर गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला औरंगाबाद रस्त्यावरील लक्ष्मीनारायण लॉन्समध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी फयाज मुलाणी आणि सहायक निवडणूक अधिकारी अनिल पाटील यांनी सर्व उमेदवारांना मतमोजणी प्रक्रिया समजावली आणि प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात केली. या निवडणुकीत तीन पॅनल होते. त्यात प्रगती पॅनलने 20 जागांवर विजय मिळविला, तर परिवर्तन पॅनल व टीडीएफ/डीसीपीएस पॅनलला खाते उघडता आले नाही.एनडीएसटी सोसायटीत सत्ताधारी असलेले महाराष्ट्र राज्य टीडीएफ शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ शिक्षकेतर संघटना, आश्रमशाळा संघटना व समविचारी संघटनेद्वारे पुरस्कृत टीडीएफ प्रगती पॅनल तयार करण्यात आले होते. या पॅनलचे नेतृत्व माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कचेश्वर बारसे, संजय चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे, ई. के. कांगणे, भाऊसाहेब शिरसाट यांनी केले होते. दरम्यान सविता देशमुख या 6 मतांनी पराभूत झाल्या असून त्यांनी फेरमतमोजणीचा अर्ज दाखल केला आहे.

टीडीएफ प्रगती पॅनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे :
नाशिक सर्वसाधारण गट – निंबा कापडणीस (4076), सचिन पगार (3733).
त्र्यंबक-पेठ – प्राचार्य दीपक व्याळीज (4693)
अनु. जाती. जमाती – अशोक बागूल (3793)
एन.टी.- मोहन चकोर (5031)
इगतपुरी – बाळासाहेब ढोबळे (4538)
दिंडोरी – विलास जाधव (3648), सटाणा – संजय देसले (4791), कळवण – सुरगाणा – देवळा – शांताराम देवरे (4356), संजय पाटील (3640)
मालेगाव – संजय वाघ (3983), मंगेश सूर्यवंशी (3616), चांदवड – ज्ञानेश्वर ठाकरे (3956), नांदगाव – अरुण पवार (4856), येवला – गंगाधर पवार (4156).
निफाड – समीर जाधव
(4584), सिन्नर – दत्तात्रेय आदिक (4541)
महिला प्रतिनिधी – विजया पाटील (3464), भारती पाटील (4101)
ओबीसी – अनिल देवरे (4100) मते घेऊन विजयी झाले आहेत.

परिवर्तन पॅनलचे संग्राम करंजकर हे एकमेव उमेदवार 3443 मतांनी विजयी झाले. त्यांनी प्रगती पॅनलचे चंद्रशेखर सावंत यांचा पराभव केला.

सभासदांनी टाकलेल्या विश्वासाचा हा विजय आहे. संपूर्ण जिल्हाभरात नेते म्हणून वावरणार्‍यांना सभासदांनी नाकारले आहे. खोट्या आरोपांना मिळालेले हे सणसणीत उत्तर असून, संस्थेच्या प्रगतीसाठी जोमाने काम करणार आहोत.
-मोहन चकोर, नेते, प्रगती पॅनल

 

सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. विजयी प्रगती पॅनलच्या उमेदवारांचे अभिनंदन. आमचा एकमेव उमेदवार निवडून आला.
-साहेबराव कुटे, नेते,
परिवर्तन पॅनल

 

सोसायटी चांगले काम करून विरोधकांनी गैरव्यवहाराचे आरोप केले. परंतु त्यात तथ्य नसल्याने सहकार खात्याने सत्ताधारी संचालकांना क्लीन चिट दिली. सभासदांनी पुन्हा प्रगती पॅनलवर विश्वास टाकून विजयी केले आहे.
-संजय चव्हाण, नेते,
प्रगती पॅनल

 

सोसायटी निवडणुकीत जिल्ह्यातील सभासदांनी आम्ही केलेल्या कामामुळेच प्रगती पॅनलच्या उमेदवारांना निवडून दिले.
-भाऊसाहेब शिरसाट,
माजी कार्यवाह, सोसायटी

हेही वाचा :

The post नाशिक : एनडीएसटी निवडणुकीत सत्ताधारी टीडीएफ प्रगती पॅनलची पुन्हा बाजी appeared first on पुढारी.