नाशिक : एसएचजेबीचे कांदा कापणी यंत्र राज्य स्पर्धेत प्रथम

चांदवड www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
येथील एसएचजेबी तंत्रनिकेतनच्या डिझाइन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट ऑफ ओनियन कटिंग मशीन या प्रकल्पाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने 2022-23 या शैक्षणिक वर्षासाठी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे एक लाखाचे बक्षीस पटकावल्याची माहिती प्राचार्य डॉ. विशाल वानखेडे यांनी दिली.

नाशिकच्या गुरू गोविंद सिंग तंत्रनिकेतनमध्ये झालेल्या स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर विभागातील सुमारे 46 विविध तंत्रनिकेतनातील उत्कृष्ट प्रकल्प सहभागी झाले होते. त्यात चांदवड तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कांदा कापणी यंत्र सादर केले होते. हे यंत्र स्वयंचलित असल्याने कांदा कापण्यासाठी शेतकर्‍यांचा वेळ, पैसे व कष्ट यांची बचत होते. हा प्रकल्प सागर ऐशी, पंकज पवार, दुर्गेश भामरे, लोकेश देवरे, दुर्गेश गोसावी यांनी साकारला होता. यासाठी त्यांना किशोर सोनवणे व प्रोजेक्ट मेन्टॉर महेश भागवत यांचे मार्गदर्शन लाभले. तंत्रनिकेतनाचे मुख्य समन्वयक राजेंद्रकुमार बंब, समन्वयक अरविंद भन्साळी, प्राचार्य डॉ. व्ही. ए. वानखेडे, प्रोजेक्ट कॉर्डिनेटर डॉ. जी. डी. शिंदे व मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख डी. व्ही. लोहार यांनीही यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा:

The post नाशिक : एसएचजेबीचे कांदा कापणी यंत्र राज्य स्पर्धेत प्रथम appeared first on पुढारी.