नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी

नाशिकरोड www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील आदिवासी बांधवांना जागृत करण्याचे काम क्रांतिकारक बिरसा मुंडा यांनी केले, त्याचप्रमाणे ब्रिटीशांच्या जाचक सत्तेविरुध्द लढण्याची प्रेरणा क्रांतीकारक बिरसा मुंडा यांनी दिली. असे प्रतिपादन एसव्हीकेटी महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप जाधव यांनी केले.

देवळाली कॅम्प येथील श्रीमती विमलाबेन खिमजी तेजुकाया महाविद्यालयात मंगळवारी [ दि. 15] क्रांतीविर बिरसा मुंडा जयंती तथा जनजाती दिन व शिक्षकेत्तर दिन साजरा झाला. त्यावेळी उपप्राचार्य दिलीप जाधव बोलत होते. याप्रंसगी उपप्राचार्य डॉ. सोपान एरंडे, शाम जाधव, सुधाकर पवार, डॉ. जयश्री जाधव आदी होते. उपप्राचार्य दिलीप जाधव पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्याच्या संग्रामात भारतीय समाजात सर्व जाती धर्मांच्या लोकांनी प्राणापणापासून योगदान दिले. हे भारतीय एकात्मतेचे प्रतिक असून ही प्रेरणा देशवाशीयांनी भावी पिढयांपर्यत पोहचवावी असे जाधव यांनी म्हटले. इतिहास विभागाचे प्रमुख सुधाकर पवार यांनी बिरसा मुंडा यांच्या संघर्षमय जिवनाची माहीती दिली. डॉ. जयश्री जाधव यांनी बिरसा यांच्या चरित्र्याचा आढाव मनोगतातून घेतला. याप्रसंगी महाविद्यालयाचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन व आभार आर. आर. सोनवणे यांनी मानले.

हेही वाचा:

The post नाशिक : एसव्हीकेटी महाविद्यालयात बिरसा मुंडा यांच्या कार्यातून सकारात्मक विचारांची पेरणी appeared first on पुढारी.