Site icon

नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
कंपनीस इंडस्ट्रिअल ऑइल सप्लाय करण्याचे खोटे सांगून एकाने येथील उद्योजकाला तब्बल 37 लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली. शहरातील नायगाय रोड येथील दत्तनगर परिसरात राहणारे सुयोग रमेश कानडे (31) यांची मुसळगावच्या औद्योगिक सहकारी वसाहतीत ओम साई बायोएजन्सी प्रा. लि. नावाने कंपनी आहे. संशयित आरोपी संतोष कुमार रा. मुंबई याने कानडे यांना मी इंडस्ट्रिअल ऑइल सप्लाय करतो, असे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. ऑइलसाठी कानडे यांनी आपल्या कंपनीच्या बँक खात्यातून संशयित आरोपीच्या खात्यावर 37 लाख 4 हजार 278 रुपयांचे आरटीजीएस केले. मात्र, बरेच दिवस होऊनही संतोष कुमारने कानडे यांना ऑइलचा पुरवठा केला नाही. वेळोवेळी विचारपूस करूनही तो उडवाउडवीची उत्तरे देतसि होता. दिलेले पैसे परत न केल्याने कानडे यांनी सिन्नर पोलिस ठाण्यात येत संशयित आरोपी संतोष कुमार याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ठकबाजीचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सहायक पोलिस निरिक्षक माळी करत आहेत.

हेही वाचा:

The post नाशिक : ऑइल पुरवठ्याच्या नावाखाली उद्योजकास 37 लाखांना चुना appeared first on पुढारी.

Exit mobile version