Site icon

नाशिक : ओझरमध्ये ७३ गोवंश जनावरांची सुटका

ओझर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

येथील पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दुर्गेश एम तिवारी व पिंपळगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी अशोक पवार यांनी मिळालेल्या गुप्त बातमीनुसार रविवारी (दि.२३) दुपारी एक वाजता ओझर गावातील के जी एन कॉलनीलगत शेटे मळ्याजवळ केलेल्या कारवाईत तब्बल 73 गोवंश जनावरांची सुटका केली.

संशयित आरोपी नंदु जयराम गांगोडे (वय-३९), विजय नंदु गांगोडे (वय १८, दोघे रा.ननाशी, ता.दिंडोरी, हल्ली के जी एन कॉलनी शेटे मळाजवळ ओझर) यांनी एकबाल अत्तार व कादीर अत्तार यांच्या शेतात शाहरुख रशीद शेख, अकबर बाबु शेख, खलील शेख कुरेशी यांच्या सांगण्यावरुन गोवंश व म्हैसवर्गीय जनावरे कत्तलीसाठी शेताच्या कंपाउंडच्या तारांना बांधुन त्याना क्रुर वागणूक दिली. ही जनावरे आलीम ईस्माईल कुरेशी, जुनेद आलीम शेख यांच्या मालकीच्या बंगल्यात पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीसाठी जवळ बाळगली. यामुळे पोलीस शिपाई जितेंद्र बागुल यांनी फिर्याद दिली असुन कार्यवाहीत ७३ गोवंश व ५ म्हैस वर्गीय जनावरे असा एकुण ६ लाख ४२ हजार ९०० रुपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

ही कामगिरी दुर्गेश तिवारी, सहा.पो.उप निरी. जोशी, पोहवा विश्वनाथ धारबळे, पो.ना दिपक गुंजाळ, पो ना बागुल, पो.शि.प्रसाद सुर्यवंशी, पो.शि राजेंद्र डंबाळे, ओझर पोलीस स्टेशन व पोलीस निरीक्षक अशोक पवार व पिंपळगाव ब. पोलीस स्टेशनकडील पो. ना. दीपक निकुंभ, पो.ना. सुनिल पगारे, पो.ना. रविंद्र गुंजाळ यांच्या पथकाने केली.

हेही वाचा : 

The post नाशिक : ओझरमध्ये ७३ गोवंश जनावरांची सुटका appeared first on पुढारी.

Exit mobile version