नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट

नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा
वाळुंज जिल्ह्यातील औरंगाबाद येथून किंगफशर कंपनीचे 2 हजार 200 बिअरचे बॉक्स घेऊन जाणार्‍या कंटेनर (एमएच 43 बीजी 5463) चालकाला बेशुद्ध करून जबरी लूट झाली आहे. यात 43 लाख 29 हजार 856 रुपयाचे 2 हजार 200 बियरचे बॉक्ससह 20 लाखांचा कंटेनर असा 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल बळजबरीने चोरी केला. या प्रकरणी 20 ते 35 वयोगटातील संशयित गुड्डू, नीलेश, सरदार, पप्पू, विकी, जिसान आणि इतर काही अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत माहिती अशी की, कंटेनर चालक मोहमद साजिद अबुलजैस शेख, (22, रा. आजमगड, उत्तरप्रदेश) याने दिलेल्या फिर्यादीनुसार 29 ऑक्टोबर रोजी कंटेनर चालक युनाटेड ब्रेव्हेज कंपनीतून किंगफिशर स्टॉन्ग बिअरचे बॉक्स भरलेला कंटेनर घेऊन मुंबई येथे जाण्यासाठी निघाला होता. सकाळी 9 च्या सुमारास 40 किमीनंतर एका हॉटेलवर जेवण झाल्यावर मुंबई येथे चालक शेख निघाला असता दोन मराठी बोलणारे इसम ठाण्याकडे जाण्यासाठी कंटेनरमध्ये बसले. शेख कंटेनर घेऊन वैजापूर, कोपरगावमार्गे सिन्नर येथे आले. तेव्हा दोन्ही इसमांनी शेख यांना समोर अर्टिगा गाडीच्या पाठीमागे गाडी घे. नाहीतर तुला कापून फेकून देऊ, अशी दमदाटी केली. इसमांपैकी एका इसमास गुड्डू अशा नावाने बोलत होते. शेख यांनी अर्टिगा गाडीच्या पाठीमागे कंटेनर घेतला. नाशिकरोड येथे आल्यावर त्यांनी रोडच्या कडेला थांबविण्यास सांगितला. तेव्हा अर्टिगा गाडी (एमएच 04 एफएफ 6351) रोडच्या कडेला थांबली होती. तेथे 3 तास थांबल्यावर दुपारी पुन्हा दोन इसमांनी कंटेनरमागे फिरवून सिन्नर बाजुकडे घेण्यास सांगितला. दुपारी 4 वाजेच्या सुमारास घोटी-सिन्नर हायवे रोडवर एच. पी. पेट्रोलपंपाजवळ कंटेनर उभा केला. यावेळी अर्टिगा गाडीतील 4 इसम नीलेश सरदार, जिसान व त्यांचा साथीदार कंटेनरजवळ आले. त्यांनी कंटेनरचालक शेख यांना शिवीगाळ, दमदाटी करून गाडीचे पाठीमागे कंटेनर घेण्याचे सांगितले. कोणीतरी इसमाने शेख यांच्या नाकावर रुमालासारख्या कपड्याने दाबून धरल्याने ते बेशुद्ध झालो. त्यानंतर 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजता शेख यांना शुध्द आली तेव्हा ते नाशिकमध्ये एका बिल्डिंगमध्ये होते. त्यांच्या बाजूला 5 ते 7 लोक होते. सायंकाळी 5 वा. गंगापूर (जि. औरंगाबाद) येथून गुड्डूसह शेख यांना कंटेनर घेऊन जाण्यास सांगत मोटारसायकलवर (एमएच 21 बीए6271) बसून शहराच्या बाहेर निघाले. त्यानंतर हरसूलपासून काही अंतरावर आल्यावर कंटेनर हा रोडच्या वळणावर नालीत अडकलेला होता.

कंटेनर घेऊन शेख यांनी रोडच्या उजव्या बाजूस शेताजवळच्या घराजवळ उभा करण्यास सांगितले. तेव्हा शेख यांना कंटेनरमध्ये अर्धेपेक्षा जास्त बिअरचे बॉक्स चोरी झाल्याचे समजते. उरलेल्या बॉक्सपैकी काही बॉक्स खाली पडलेले होते. तेथील 5 ते 6 इसमांनी कंन्टेनरमधील सर्व बॉक्स रोडच्या कडेला असलेल्या घरामध्ये खाली केले. तेथे आणखी एक मोटारसायकल (एमएच 15 डीआर 7300) हिच्यावर संशयीत निलेश व सरदार नावाचे इसम आले. त्यानंतर 31 ते 3 नोव्हेंबरपर्यंत पप्पू, विकी, जिसान व आणखी दोन अशानी कंटेनरचालक शेख यांना नाशिक येथे बिल्डिंगमध्ये डांबून ठेवले. मात्र 3 नोव्हेंबरच्या सायंकाळी शेख बिल्डिंगमधून बाहेर पडण्यास यशस्वी झाले. तेथून रोडवर आलो. एक रिक्षाने मुंबई नाका पोलिस स्टेशनला गेले. त्यांनी हरसूल पोलिस ठाण्याला तक्रार करण्यास सांगितले. मात्र, प्रथम घटना घोटी पोलिस ठाणे हद्दीत घडल्याने फिर्यादीने शनिवारी (दि. 5) घोटी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे, उपविभागीय अधिकारी कविता फडतरे, पोलिस उपअधीक्षक अर्जुन भोसले यांनी भेट दिली असून, याबाबत घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सहायक पोलिस निरीक्षक दिलीप खेडकर यांनी तपास सुरू केला आहे. सदर माल कुठे आढळ्यास घोटी पोलिसांसोबत संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस सहायक निरीक्षक खेडकर यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट appeared first on पुढारी.