नाशिक : कंत्राटी कर्मचार्‍यांना यापुढे कधीही कामावरुन कमी करण्यात येणार नाही, दादा भुसे यांनी दिली सेवेची पावती

सेवा www.pudhari.news

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
मालेगाव महानगरपालिकेने कामावरून कमी केलेल्या सातशे कंत्राटी कर्मचार्‍यांना महापालिकेत पुन्हा कामावर घेतले आहे. गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या धार्मिक कार्यक्रमा दरम्यान या लोकांनी अतिशय चांगल्या प्रकारे सेवा दिली. त्यांच्या या कामाची पावती म्हणून त्यांना यापुढे कधीही कामावरून कमी करण्यात येणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांनी येथे केले.

14 जानेवारी नामांतर दिन या क्रांती विजयदिनाचे औचित्य साधून कॅबिनेट मंत्री तसेच नाशिक जिल्हा पालकमंत्री दादा भुसे यांचा मालेगाव शहरात सात दिवस संपूर्ण भारतातून जे लाखो लोक आले होते, त्यांचे योग्य नियोजन तसेच मालेगाव महानगरपालिकेतील संपूर्ण कंत्राटी सफाई कर्मचार्‍यांचा प्रश्न मिटवून त्यांना पूर्ववत कामावर घ्यावयास लावले, हा जिव्हाळ्याचा महत्त्वपूर्ण विषय मार्गी लावल्याबद्दल मालेगाव रिपाइं (आठवले) पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष प्रा. भारतजगताप, तालुकाध्यक्ष दिलीप अहिरे, शहराध्यक्ष विकास केदारे व पदाधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपमहापौर सखाराम घोडके, माजी नगरसेवक नीलेश काकडे, डॉ. सुराणा, रामाभाऊ मिस्तरी, किशोर बच्छाव, पराग निकम, बाळासाहेब पगारे, विष्णू शेजवळ, सुदेश वाघ, किरण पगारे, सुशील उशिरे, नीलेश अहिरे, विनायक वाघ, सनी म्हसदे, दिलीप शेजवळ, आनंद खैरनार, नंटी महिरे, पिंटू अहिरे, अण्णा मोरे, भीमराव मगरे, रविराज जगताप, अशोक गायकवाड, बाळू बिर्‍हाडे, अलका म्हसदे व महिला आघाडी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : कंत्राटी कर्मचार्‍यांना यापुढे कधीही कामावरुन कमी करण्यात येणार नाही, दादा भुसे यांनी दिली सेवेची पावती appeared first on पुढारी.