नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

घंटागाडी कर्मचारी प्रामाणिकपणा,www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

घरातील आवरासावर करताना नजरचुकीने घंटागाडीत कचऱ्यासोबत टाकली गेलेली तब्बल पाच हजार रुपयांची रोख रक्कम घंटागाडी कामगारांनी परत केल्याने त्यांच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

जेलरोडच्या पिंपळपट्टी रोड येथील रंजना भालेराव यांनी दसऱ्यानिमित्त घराची आवराआवर करताना नजरचुकीने त्यांच्याकडून पाच हजार रुपये कचऱ्याच्या डब्यात पडले. घंटागाडी आल्यानंतर भालेराव यांनी कचऱ्याचा डबा घंटागाडीत टाकला. घरी आल्यावर त्यांच्या ही बाब लक्षात आली. कचऱ्यासोबत आपली रोख रक्कम गेल्याचे त्यांनी त्वरित तनिष्क एंटरप्राइजचे सुपरवायझर ओम बोबडे, राहुल मोरे यांना कळवले. या दोघांनी या भागातील घंटागाडी (एम एच१५ एफएफ क्यू ०३६२) चालक गणेश साळुंखे व कामगार उमेश कोळी, पीतांबर अलकारी यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी कचरा वेगळा केल्यानंतर पाच हजार रुपये सापडले. ती त्यांनी रंजना भालेराव यांना परत केली. नागरिकांनी घंटागाडी कामगारांचे कौतुक केले.

हेही वाचा :

The post नाशिक : कचऱ्यासोबत आलेले पाच हजार रुपये दिले परत, घंटागाडी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा appeared first on पुढारी.