नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध

devla www.pudhari.news

नाशिक (देवळा) :  पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश नानासाहेब शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कणकापूर सत्तांतर होऊन माजी उपसरपंच जे. डी. शिंदे, डॉ. किरण शिंदे, ॲड तुषार शिंदे, नामदेव शिंदे, नितीन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने स्पष्ट बहुमत प्राप्त करून भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. यानंतर झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीत पहिल्यांदा अनुराधा जैन यांची उपसरपंच पदी वर्णी लागली. जैन यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी सोमवारी, दि. २७ रोजी उपसरपंच पदाच्या निवडणुकीसाठी सरपंच बारकू वाघ यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यात सर्वानुमते उपसरपंचपदी जगदीश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळत्या उपसरपंच अनुराधा जैन, ग्रामपंचायत सदस्य गोविंद बर्वे, जिजाबाई मोरे, बिबाबाई बच्छाव, बीजला बर्डे, सुशिला पवार, किरण गांगुर्डे, पांडुरंग पिंपळसे उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेविका जयश्री आहेर यांनी कामकाज बघितले. नवनिर्वाचित उपसरपंच जगदिश शिंदे यांचे डॉ. किरण शिंदे, गणपत शिंदे, बायजाबाई शिंदे, दादाजी शिंदे, भास्कर शिंदे , कौतिक शिंदे , लक्ष्मण शिंदे, दिलीप जैन, लखा शिंदे , रमण सावकार, सुधाकर शिंदे, कारभारी शिंदे , दोधा शिंदे, संजय शिंदे, बापू शिंदे, अशोक शिंदे, आबा शिंदे, नितीन शिंदे, हिरामण बच्छाव, रवी टेलर, सोनू शिंदे, सागर बकुरे, ऋषी गोसावी, संदीप शिंदे, दादाजी गोसावी, रवी बर्वे, योगेश गांगुर्डे, राकेश बर्वे, योगेश शिंदे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शिंदे यांच्या निवडीचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवा, आमदार डॉ. राहुल आहेर, भाजपचे जिल्हाध्यक्ष केदा आहेर, तालुका अध्यक्ष किशोर चव्हाण, अतुल पवार ,संभाजी आहेर ,भाऊसाहेब पगार,जितेंद्र आहेर ,नानू आहेर आदींनी शिंदे यांचे अभिनंदन केले.

उपसरपंच निवड प्रसंगी जगदीश शिंदे यांच्या वतीने गावातील सर्व ग्रामस्थांना भगवा फेटा परिधान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच ग्रामसेवक जयश्री आहेर, कर्मचारी प्रकाश शिंदे , सतिश अहिरे, पूजा मोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. त्यानंतर  शिवरायांची आरती व फटाक्यांच्या आतषबाजी करण्यात आली. डॉ. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रोटेशन पध्दतीनुसार जगदीश शिंदे यांची उपसरपंचपदी वर्णी लागली. अनुराधा जैन यांनी एक महिन्याच्या कालावधीनंतर उपसरपंच पदाचा राजीनामा दिला. राजकारणात शब्दाला किंमत असते. हे निवडणूकप्रसंगी जैन यांनी दाखवून दिले. गावाच्या विकासात मोलाची साथ कायम राहिल.  असे अनुराधा जैन यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : कणकापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे जगदीश शिंदे बिनविरोध appeared first on पुढारी.