Site icon

नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, वणी पोलिसांची कारवाई

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लखमापुर फाटा परिसरात पोलिसांनी सापळा लावून जनावरांना कत्तली साठी घेऊन जाणा-या दोन पिकअप गाड्या काही वेळाच्या फरकाने पकडल्या. पिकअपमध्ये गाय, वासरे व बैल असे 12 जनावरांची वाहतूक करण्यात येत होती.  पोलिसांना या जनावरांची सुटका करुन दोन पिकअप ताब्यात घेतल्या.

वणी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडखे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिस उपनिरीक्षक रामकृष्ण सोनवणे व पोलिस कर्मचारी कुणाल मराठे, अण्णा जाधव, कमलेश देशमुख, भगवान उदार, सुनिल ठाकरे, किरण धुळे यांनी सापळा लावून ही कारवाई केली.

पिकअपमधून जनावरांची निर्दयीपणे कत्तलीच्या हेतूने वाहतूक करण्यात येत होती. पोलिसांनी पिकअप चालक कादिर अकिल नाईकवडे, रा. जामुनमाथा, ता. सुरगाणा व जुबेर हुसेन शेख, रा. उंबरठाण,ता. सुरगाणा या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन पिक अप जप्त करुन जनावरांची सुटका पोलिसांनी केली. वणी येथील गोशाळेत ही जनावरे सोडण्यात आली आहे. सुरगाण्याच्या परिसरातून अनेकदा कत्तली साठी नेण्यात येणारी जनावरे पकडली जातात. पुर्वी वणी मार्गे ही अनेक कारवाया झाल्या आहे. आता एवढ्यात करंजखेड कोशींबे या मार्गावरुन जात असल्याचे कारवाईत दिसून येत आहे. वणी पोलिस ठाण्याचे सपोनि.निलेश बोडखे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : 

The post नाशिक : कत्तलीसाठी नेण्यात येणारी जनावरे पकडली, वणी पोलिसांची कारवाई appeared first on पुढारी.

Exit mobile version