Site icon

नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको

नाशिक (सटाणा)  : पुढारी वृत्तसेवा
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणीत शेतकरी संघटनेने सोमवारी (दि.22) राष्ट्रीय महामार्गावर करंजाड उपबाजारासमोर रास्ता रोको केला.

कांदादरासह शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गाजवळ करंजाड येथील नामपूर बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी शासकीय धोरणाविरोधात जोरदार टीकास्त्र सोडले. जवळपास दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूला दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सहायक पोलिस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी व महसूल अधिकार्‍यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब चौधरी, तालुका उपाध्यक्ष नंदू अहिरे, कार्याध्यक्ष शैलेंद्र कापडणीस, तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र सूर्यवंशी, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष किरण पाटील, उपाध्यक्ष नयन सोनवणे, माणिकराव देवरे, देवळा तालुकाध्यक्ष माणिकराव निकम, शरद जोशी विचार मंचचे तालुकाध्यक्ष प्रवीण अहिरे, कळवण तालुकाध्यक्ष बाळासाहेब शेवाळे, नामपूर बाजार समितीचे सभापती कृष्णा भामरे, द्वारकाधीश कारखान्याचे सचिन सावंत आदींसह शेतकरी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : करंजाड उपबाजार समितीसमोर रास्ता रोको appeared first on पुढारी.

Exit mobile version