नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला

पर्समधून पैसे चोरले www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

भुजबळ फार्म येथे दवाखाना असलेल्या फिर्यादी डॉक्टर सोनिया चंद्रशेखर भाला (रा. रविशंकर मार्ग) यांच्याकडे कामास असलेला संशयित आरोपी आकाश लक्ष्मण काळे याने भाला यांच्या पर्स मधून पाच लाख रुपयांची चोरी केल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी भाला यांना त्यांच्या मुळ गावाला जायचे असल्याने पर्समध्ये रोख स्वरूपात पाच लाख रुपये ठेवलेले होते. त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी त्यांची पर्स कॅबिनमध्ये ठेवलेली असताना यावेळेस एक पेशंट दवाखान्यात आल्यानंतर घेऊन आलेल्या ड्रायव्हरला पैसे देण्यासाठी पर्स उघडल्यानंतर त्या पर्स मधून पैसे गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पैसे चोरी गेल्याचे कळताच त्यांनी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये फुटेज चेक केल्यानंतर हे पैसे आकाशने चोरी केल्याचे दिसून आले. यानंतर घरातील सर्व पैशांचा हिशोब केला असता सात लाख 83 हजार रुपये कमी आढळले. यामुळे फिर्यादी भाला यांनी अंबड पोलीस ठाण्यात आकाश विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस हवालदार हरून शेख करीत आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कर्मचाऱ्यानेच डॉक्टरच्या पर्सवर मारला डल्ला appeared first on पुढारी.