नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते

प्रगती पॅनल www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे या उद्देशाने कर्मवीरांनी मविप्र संस्थेची स्थापना केली. निफाड तालुक्यातून कर्मवीर काकासाहेब वाघ, ॲड. विठ्ठलराव हांडे, दुलाजीनाना पाटील, डॉ. वसंत पवार, मालोजीकाका मोगल यांनी संस्थेच्या उन्नतीसाठी भरीव कार्य केले. मविप्र संस्था ही तालुक्याचे वैभव असून, कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी प्रगती पॅनलला निवडून द्या, असे आवाहन माणिकराव बोरस्ते यांनी केले.

चांदोरीत प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाप्रसंगी आयोजित प्रगती पॅनलच्या मेळाव्यात ते बोलत होते. व्यासपीठावर जगन नाठे, रामचंद्र पाटील, यशवंत अहिरे, श्रीराम शेटे, नीलिमा पवार, डॉ. सुनील ढिकले, डॉ. विलास बच्छाव, डॉ. प्रशांत पाटील, मनोहर देवरे, माणिक शिंदे, दिलीप मोरे, दत्तात्रय गडाख, सुरेश कळमकर, प्रल्हाद गडाख, सिंधू आढाव, शंकरराव कोल्हे-खेडेकर, डॉ. जयंत पवार आदी उपस्थित होते. मविप्र संस्थेच्या कार्यकारी मंडळाने एकविचाराने उत्कृष्ट कार्य केले आहे. कोरोनामध्ये ऑनलाइन शिक्षणासोबतच सर्वसामान्यांना उपचार देऊन दिलासा दिल्याचे बोरस्ते यांनी सांगितले. सध्याची लढाई वैचारिक आहे. विरोधक केवळ अपप्रचार करीत आहे. कर्मवीरांच्या घरातील सभासद केले असून, कोणतेही बोगस सभासद केले नसल्याचे नीलिमा पवार यांनी स्पष्ट केले. स्पर्धेच्या युगात शालेय वातावरण निर्मितीसाठी चांगल्या इमारती व सुविधा आहेत. एकविचाराचे लोक असल्यावरच संस्था टिकतात. संस्थेच्या दीर्घकालीन नियोजनासाठी मतभेद विसरून नीलिमा पवार यांच्या मागे ताकद उभी करा, असे आवाहन ज्येष्ठ नेते श्रीराम शेटे यांनी केले.

नानासाहेब जाधव यांची माघार : सरचिटणीसपदासाठी निफाड तालुक्यातील कसबे सुकेणे येथील नानासाहेब जाधव यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माघारीच्या निर्धारित मुदतीतही त्यांचा अर्ज कायम होता. जाधव यांनी मंगळवारी (दि.२३) माघार घेत प्रगती पॅनलच्या सरचिटणीस पदाच्या उमेदवार नीलिमा पवार यांना पाठिंबा दिला.

हेही वाचा:

The post नाशिक : कर्मवीरांची अस्मिता जपण्यासाठी ‘प्रगती’ला निवडून द्या : माणिकराव बोरस्ते appeared first on पुढारी.