नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात

कॉंग्रेस पदयात्रा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या 75 व्या अमृत गौरव वर्षानिमित्त नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटीमध्ये गौरव पदयात्रेस सातपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वातंत्र्यसेनानी राघोजी भांगरे यांना वंदन करून सुरुवात झाली.

सातपूर राजवाडा येथून निघालेली पदयात्रा निगळ गल्ली, भंदुरे गल्ली, छत्रपती शिवाजी महाराज भाजीमंडई, सातपूर कॉलनी, अंबिका स्वीटपासून कार्बन नाका येथे आली आणि तेथे यात्रेचा समारोप झाला. सातपूर काँग्रेस ब्लॉक कमिटी अध्यक्ष कैलास कडलग यांनी आभार मानले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष शरद आहेर म्हणाले की, 9 ऑगस्ट क्रांतिदिनापासून ते 16 ऑगस्टपर्यंत भारतभर विविध कार्यक्रम होणार असून, महात्मा गांधी यांच्या चळवळीपासून ते अमृत महोत्सव वर्षापर्यंत काँग्रेसने देशासाठी केलेल्या बलिदानाची जनसामान्यांना माहिती व्हावी, यासाठी पदयात्रा काढण्यात येत आहे. नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे नाशिकरोड, पंचवटी, मध्य नाशिक, सिडको तसेच प्रत्येक ब्लॉक कमिटीमध्ये अमृत महोत्सव गौरव पदयात्रा आयोजित करण्यात येणार आहे. त्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शरद आहेर यांनी केले.

याप्रसंगी माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी नगरसेविका हेमलता पाटील, वत्सला खैरे, आशा तडवी, स्वाती जाधव, सुरेश मारू, अमोल सूर्यवंशी, चंद्रकांत निर्वाण, भिवानंद काळे, अनिल बहोत, संतोष ठाकूर, ब्लॉक अध्यक्ष उद्धव पवार, नीलेश खैरे, कैलास कडलग, विजय पाटील, महिला अध्यक्षा माया काळे, चारुशीला शिरोडे, चारुशीला काळे, भरत पाटील, सोमनाथ मोहिते, अल्ममेश खान, देवा देशपांडे, कल्पेश केदार आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post नाशिक : काँग्रेसच्या आजादी गौरव पदयात्रेस सातपूरपासून सुरुवात appeared first on पुढारी.