नाशिक : कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा

कांद्याचे भाव गडगडल्याने चांदवडला शेतकऱ्यांनी मुंबई आग्रा महामार्ग रोखला असून माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन छेडले आहे.

यंदा कांद्याचे उत्पादन चांगले आले असून चांगला भाव मिळेल अशी अशा असताना बाजारभावात कांद्याची सतत घसरण सुरूच आहे. त्यामुळे कांद्याला 3000 हजार रुपये हमीभाव द्या. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची त्वरीत भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा.
अल्प दराने विक्री केलेल्या कांद्यास शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 1500 रुपये अनुदान द्या. अन्यथा जलभरो आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला आहे. शेतकऱ्यांनी संतप्त होत चांदवड बाजार समितीचा लिलाव  देखील बंद पाडला  आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी रोखला महामार्ग appeared first on पुढारी.