Site icon

नाशिक : कानडे मारुती लेनमध्ये टेस्टिंग लॅबला आग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शहरातील कानडे मारुती लेन येथील एका टेस्टिंग लॅबला रविवारी (दि.18) सायंकाळी आग लागली. या आगीत हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जीवित हानी झाली नाही. महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या दोन बंब तसेच जवानांनी एक तास परिश्रम करून आग आटोक्यात आणली.

टीटी सर्जिकल लॅबला आज सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक आग लागली. लाकडी तसेच प्लास्टिक साहित्य व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. आगीची माहिती मिळतात परिसरातील नागरिकांनी अग्निशामक दलाला माहिती दिली. अग्निशामक दलाचे प्रमुख एस. के. बैरागी यांच्या नेतृत्वाखाली लीडिंग फायरमॅन नदीम शेख, एम.डी. कदम, आर. एस. नाकीबे, बी. आर. लासुरे, बी. एन. खोडे, आर. एस. गांगुर्डे आदी जवानांनी आग आटोक्यात आणली. वाडा रिकामा असल्यामुळे जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा:

The post नाशिक : कानडे मारुती लेनमध्ये टेस्टिंग लॅबला आग appeared first on पुढारी.

Exit mobile version