नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’

सिडको : पुढारी वृत्तसेवा
सीटूप्रणीत बांधकाम कामगार संघटनेने सोमवारी (दि.10) सातपूर येथील जुने सीटू कार्यालय ते कामगार उपआयुक्त कार्यालय असा मोर्चा काढला. यावेळी कामगार उपआयुक्त विकास माळी यांच्याशी बांधकाम कामगारांना दिवाळीला 20 हजार रुपये बोनस व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली.

बांधकाम कामगारांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे न घेण्याची भूमिका डॉ. डी. एल. कराड यांनी घेतली होती. हजारो कामगार कामगार उपआयुक्त कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर बसून होते. त्यामुळे उपआयुक्त माळी यांनी याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून बैठकीचे आयोजन केले. अन्य मागण्यांबाबत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाबरोबर दि. 13 रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बांधकाम कामगारांच्या बोनस व अन्य मागण्या मान्य न झाल्यास दि.17 रोजी कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या सांगलीतील घरासमोर ‘शिमगा आंदोलन’ करण्याचा इशारा यावेळी डॉ. कराड यांनी दिला. यावेळी सीटू उपाध्यक्ष सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, सिंधू शार्दुल, गोरख सुरासे, आत्माराम डावरे, संजय पवार, सतीश खैरनार यांनी मोर्चाला मार्गदर्शन केले. यावेळी मोहन जाधव, राहुल नारनवरे, सोपान जायभावे, हिरामण तेलोरे, संगीता भवर, निवृत्ती कडू, वैजयंता वाटोरे, अमर माझी, ज्ञानबा गायकवाड, ज्ञानबा थोरात, विनोद डगळे, गोरख सुरासे, तुषार आहेर, रत्ना तालके, मनोहर भालेराव, युवराज सोनवणे, संजय विधाते, अरुण गावनडे, संतोष वळवंटे, किशोर उगले, आशा तेजाळे आदींसह कामगार उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : कामगार उपआयुक्त कार्यालयावर मोर्चा; 17 ला ‘शिमगा’ appeared first on पुढारी.