नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : दुसर्‍या दिवशी दोन अर्ज दाखल

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक बाजार समितीच्या बहुचर्चित निवडणूक प्रक्रिया सोमवार (दि. 27) पासून सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ग्रामपंचायत-सर्वसाधारण मतदारसंघातून गिरणारे येथील तानाजी निवृत्ती गायकर यांनी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर मंगळवार (दि.28) ग्रामपंचायत सर्वसाधारण गटातून सारूळ येथील सदानंद नवले, तर सहकारी संस्था सर्वसाधारण गटातून मातोरी येथील पंडितराव कातड पाटील यांनी अर्ज दाखल केला.

दरम्यान जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्यांच्या निवडणुका जाहीर झाल्याने ग्रामीण भागात इलेक्शन फिव्हर बघायला मिळत आहे. नाशिक बाजार समितीचा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विचार करता या निवडणुकीनिमित्त साकारणार्‍या संभाव्य पॅनल्सद्वारे दोन आजी-माजी खासदार आमने-सामने उभे ठाकणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी खासदार हेमंत गोडसे यांना नेतृत्व करण्याचे साकडे घातले आहे. शिवसेना-भाजप युतीच्या माध्यमातून उमेदवार देत पॅनल उभारावा आणि या पॅनलचे नेतृत्व खासदार गोडसे यांनी करावे, असे साकडे इच्छुकांनी घातले आहे. नाशिक बाजार समितीवर माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे वर्चस्व आहे. गत निवडणुकीत शिवाजी चुंभळे यांनी पिंगळे यांच्या वर्चस्वाला आव्हान देत सत्ताबदल करण्यात यश मिळविले होते. इच्छुकांच्या हाकेला साद देत खासदार गोडसे यांनी युतीच्या संभाव्य पॅनलचे नेतृत्व केल्यास महाविकास आघाडीच्या संभाव्य पॅनलचे नेते म्हणून माजी खासदार पिंगळे या आजी-माजी खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती : दुसर्‍या दिवशी दोन अर्ज दाखल appeared first on पुढारी.