नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा

Dr. Bharti Pawar www.pudhari.news
नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा
कोरोनानंतर अतिवृष्टीचे सावट बळीराजावर घोंघावत आहे. अतिवृष्टीमुळे उभे पीक डोळ्यासमोर मातीमोल होत असल्याने बळीराजा संकटात असताना वाढदिवस साजरा न करता जिल्ह्यात गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात यावे, असे निर्देश केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी जाहीर केले होते.
या निमित्ताने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात गरोदर माता तपासणी शिबिराचे आयोजन सुवर्णा जगताप यांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी अध्यक्षस्थानी सुवर्णा जगताप तर प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. रामकृष्ण अहिरे, डॉ. स्वप्निल पाटील, डाॅ. अमित धोंगडे, भाजपा मंडल अध्यक्ष महिला आघाडी स्मिता कुलकर्णी, रंजना शिंदे, सिंधू पल्लार, पूजा भावसार, शैलजा भावसार, भारती भांबारे, नंदा शर्मा आदी उपस्थित होते. शिबिरात गरोदर मातांच्या तपासणी सोबतच समाधानकारक समुपदेशनही करण्यात आले. अल्पोपहार व गरोदर मातांच्या तपासणीसह त्यांच्यासाठी लागणाऱ्या इतर सुविधा देखील पुरवण्यात आल्या. यावेळी परिसरातील व आजूबाजूच्या गावातील १०३ गरोदर मातांनी या शिबिराचा लाभ घेतला व २० मातांची सोनोग्राफी करण्यात आली. यावेळी रुग्णालयातील सर्व आरोग्य कर्मचारी परिचारिका व नागरिक उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांचा वाढदिवस संकल्प दिन म्हणून साजरा appeared first on पुढारी.