नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा

बिबट्या

नाशिक (गोंदेगाव) : पुढारी वृत्तसेवा
निफाड तालुक्यातील कोळवाडी – शंकरनगर येथील कापसे वस्तीवर शनिवारी (दि. 20) पहाटे 3.30 च्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून वासराचा फडशा पडला. नागरी वस्तीत आक्रमण करून पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याची शंकरनगरमधील ही पहिलीच घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शंकरनगरमध्ये योगेश विष्णू कापसे यांची वस्ती आहे. त्यांच्या घरासमोरील वासरावर पहाटेच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कोळवाडीत बिबट्याकडून वासराचा फडशा appeared first on पुढारी.