Site icon

नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आर्थिक वर्ष संपून चार आठवडे झाले, तरीही जिल्हा कोषागार विभागाने कार्यान्वयीन यंत्रणांच्या मागणीनुसार तयार करून ठेवलेले धनादेश वितरीत केलेले नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेचे जवळपास दीडशे कोटींची देयके रखडली आहेत.

पुढील सूचना येईपर्यंत हे धनादेश संबंधित यंत्रणांना देऊ नयेत, अशा सूचना जिल्हा कोषागार विभागाला असल्याने धनादेश दिले जात नसल्याचे समजते. त्यामुळे जि.प.मध्ये ठेकेदारांच्या चकरा वाढल्या आहेत. जिल्हा कोषागार कार्यालयाने मार्चअखेरीस ऑनलाइन वितरित केलेल्या निधीपोटी तयार धनादेश संबंधित यंत्रणांना देऊ नये, अशा सूचना मंत्रालयस्तरावरून आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे जि.प.च्या वित्त विभागाने सादर केलेली तब्बल 152 कोटींची देयके कोषागारात रखडली आहेत. यातील बहुतांश देयके ही ठेकेदारांची आहेत. देयके सादर होऊन महिना उलटूनदेखील, बिल प्राप्त होत नसल्याने ठेकेदारांच्या फेर्‍या वाढल्या आहेत. 21 दिवस होऊनही निधी मिळत नसल्याने विभागाला निधीची प्रतीक्षा आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : कोषागार विभागाकडे अडकले जिल्हा परिषदेचे दीडशे कोटी appeared first on पुढारी.

Exit mobile version