नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन

लासलगाव www.pudhari.news

नाशिक (लासलगाव) : पुढारी वृत्तसेवा

लासलगाव विंचुररोडवर असलेल्या एक्सिस बँकेचे एटीएम् मशिन अज्ञात चोरट्यांनी फोडून चक्क ते मशिनच एर्टिका वाहनातून पळवून नेल्याची घटना सोमवारी (दि.5) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. हा सर्व प्रकार सिसिटिव्हीत कैद झाला आहे. मात्र पोलिसांनी नाकाबंदी करून जलद गतीने वाहनाचा पाठलाग केला असता अज्ञात संशयित चोरट्यांनी एटीएम मशीन पोलिसांच्याच वाहनावर फेकून संशयित चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहेत.

याप्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार लासलगाव विंचुररोडवर एक्सिस बँक असून त्या बँकेचे एटीएम मशीन बँकेच्या लगतच्या गाळ्यातच आहे. सोमवारी (दि.5) मध्यरात्रीच्या सुमारास संशयित अज्ञात चोरट्यांनी सदर एटीएम मशीन फोडले व ते संपूर्ण मशीनच चोरट्यांनी सोबत आणलेल्या एर्टिका वाहनातून पळवून नेले. घटनेचा प्रकार एटीएमच्या सीसीटीवी कॅमेरात कैद झाला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी नाकाबंदी केली व जलद गतीने तपास चक्र सुरू करून पोलिस नाईक योगेश शिंदे, पोलिस कर्मचारी सुजित बारगळ यांनी एका खाजगी वाहनाद्वारे या चोरट्यांचा पाठलाग केला असता चोरट्यांनी एटीएम् मशिन नाशिक औरंगाबादरोड वरील बोकङदरे शिवारात पोलिसांच्या खाजगी वाहनावर फेकून चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल वाघ, पोलिस कर्मचारी प्रदीप अजगे, कैलास महाजन घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी लासलगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहे.

लासलगाव www.pudhari.news
लासलगाव : एटीएम मशीन ताब्यात घेताना पोलीस. (छाया: राकेश बोरा)

हेही वाचा:

The post नाशिक क्राईम : चोरट्यांनी पळवले चक्क एटीएम मशीन appeared first on पुढारी.