नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन

माहिती पुस्तिकेचे प्रकाशन,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण विभागातर्फे जागतिक क्षयरोग दिनानिमित्त शुक्रवारी (दि.२४) सिडकोतील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्रापासून रॅली काढण्यात आली. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते क्षयरोगाच्या जिवाणूंचा शोध लावणारे शास्त्रज्ञ रॉबर्ट कॉक्स यांच्या प्रतिमेचे आणि धन्वंतरीचे पूजन करण्यात आले.

यावेळी मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, ख्रिस्तोफर वेगास, सीमा लेले, दिनेश देशमुख, डॉ. विनोद पावसकर, डॉ. योगेश कोशिरे, डॉ. चारुदत्त जगताप, डॉ. श्यामल परदेशी, डॉ. स्वाती भेंडाळे, भारतकुमार झांबरे, महेंद्र खैरनार, अजय जाधव, भगवान भगत, भालचंद्र लहवारे, तुषार जावळे, संदीप गवळी आणि सिडको, मोरवाडी मनपा रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

२५ क्षयरुग्णांना मदत

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत गेट वे हॉटेलतर्फे २५ क्षयरुग्णांना दत्तक घेऊन त्यांना पोषण आहार किटचे वाटप आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले. जनजागृतीसाठी छापलेल्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. उपचार सुरू असलेल्या क्षयरुग्णांनी शासनामार्फत मिळणाऱ्या सर्व मोफत सुविधांचा लाभ घ्यावा आणि पूर्ण उपचार घेऊन बरे व्हावे, असे आवाहन आयुक्तांनी केले.

क्षयरोग मुक्तीसाठी शपथ

मनपा शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी क्षयरोग मुक्तीसाठी सर्वांना शपथ दिली. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून क्षयरोगाविषयीचे गैरसमज दूर केले. रॅलीमध्ये डॉट्स सामाजिक संस्थेचे कर्मचारी, सिडको कॉलेज, धन्वंतरी कॉलेज, नर्सिंग कॉलेजचे ३५० विद्यार्थी शिक्षकवृंद, वैद्यकीय अधिकारी, राष्ट्रीय दुरीकरण कार्यक्रम विभागाचे कर्मचारी सहभागी झाले होते.

हेही वाचा :

The post नाशिक : क्षयरोग जनजागृतीसाठी आयुक्तांच्या हस्ते माहितीपुस्तिकेचे प्रकाशन appeared first on पुढारी.