नाशिक : क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ पोषण आहार

निक्षय मित्र www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक महापालिकेच्या सातपूरमधील मायको रुग्णालयातील क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ सहा महिन्यांचा पोषण आहार पुरवठा करणार आहे. क्षयरोग रुग्णांना मदत करण्यासाठी पुढाकार घेणार्‍या संबंधित संस्था तसेच व्यक्तींना ‘निक्षय मित्र’ म्हटले जाते.

प्रधानमंत्री क्षयरोगमुक्त भारत अभियानांतर्गत निक्षय मित्र बॉश (मायको) कंपनीकडून क्षय रुग्णांना 17 ऑक्टोबर रोजी नाशिक महापालिकेच्या क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत सातपूर मायको रुग्णालयातील 25 क्षय रुग्णांना आहाराचे वाटप करण्यात आले. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकमधील बॉश (मायको) कंपनीच्या सीएसआर निधीमधून पुढील सहा महिने प्रत्येक क्षय रुग्णाला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोषण आहार देण्यात येणार आहे. उपचार घेत असलेल्या सर्व क्षय रुग्णांसाठी उपचारासोबत पोषण आहार महत्त्वाचा आहे. त्यामुळे रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. रुग्ण लवकर बरा होतो, अशी माहिती शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी दिली. कार्यक्रमाप्रसंगी बॉश कंपनीच्या डॉ. शेरॉन जॉर्ज, स्नेहा जंगम, अंजली पिंगळे, सागर काजळे, मनपाच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे, डॉ. अशोक गायकवाड, डॉ. प्राची सोनवणे तसेच शहर क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान दानशुरांनी या कामी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : क्षयरोग रुग्णांना ‘निक्षय मित्र’ पोषण आहार appeared first on पुढारी.