नाशिक : खंडेराव महाराज यात्रेनिमित्त दीड लाखाच्या कुस्त्या 

ओझर : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्तीच्या फडात यात्रा कमेटीने पंचवीस हजारांची अंतिम कुस्ती नारायण मार्कंड (दत्ताचे शिगवे) आणि नवनाथ मालसाने कोराटे (दिंडोरी) यांच्यात  झाली. यामध्ये नारायण मार्कंड याने नवनाथ मालसाने दिंडोरी यास चितपट करून अस्मान दाखवले व पंचवीस  हजार रुपयांची अंतिम लढत जिंकली. यापूर्वी सुध्दा नारायण मार्कंड याने सन २०१९ ला झालेल्या यात्रा कमेरीच्या अंतिम कुस्तीतही पाशा पटेल ( दिल्ली ) यास अस्मान दाखवून अकरा हजाराची कुस्ती जिंकली होती.
येथील यात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर दोन वर्षाच्या काळानंतर झालेल्या ओझर येथील सोनेवाडी रोडवर रंगलेल्या कुस्त्यांच्या फडात जिल्हयातील अनेक पहिलवानांनी हजेरी लावली. प्रारंभी कुस्त्यांना प्रथेप्रमाणे गोडी- शेव रेवडयांपासून लहान पहिलवानांच्या कुस्त्यांना प्रारंभ झाला. मालेगांव, चापडगांव पिंपळनेर, दत्ताचे शिगवे, कोराटे, दिंडोरी, ओझर, मोहाडी मिठसागरे भगूर, लाखलगांव मनमाड अशा अनेक पहिलवानांच्या सहभागाने कुस्त्यांचा फड रंगला. यात्रा कमेटीने लावलेल्या शेवटच्या नारायण मार्कंड (दत्ताचे शिगवे) आणि नवनाथ मालसाने कोराटे (दिंडोरी ) यांच्यात अटीतटीची पंचवीस हजार ( २५००० ) रुपयांची कुस्ती झाली यात  नवनाथ मालसाने याला नारायण मार्कंड याने चितपट केले. या शेवटच्या पंचवीस हजार रुपयांच्या अंतिम कुस्तीचे पंच म्हणून यात्रा कमेटी अध्यक्ष धनंजय पगार, सहखजिनदार अशोक शेलार, किशोर त्रिभुवन  यांच्या हस्ते शेवटची कुस्ती लावण्यात आली. या शेवटच्या अटीतटीच्या व चुरशीच्या कुस्तीत नारायण मार्कंड व नवनाथ मालसाने शेवटपर्यंत घाम येईपर्यंत एकमेकांवर डाव करित होते. शेवटी यात्रा कमेटीने कुस्ती चितपट झालीच पाहिजे असा आग्रह धरला शेवटी कुस्ती चितपट झाली आणि नारायण मार्कंड याने पंचवीस हजाराचे बक्षीस जिंकले सन २०१९ ला झालेल्या अंतिम कुस्तीतही नारायण मार्कड याने पाशा पटेल (दिल्ली) याला चितपट करून अस्मान दाखवले होते. त्यामुळे त्याचे यात्रा कमेटीने शाल श्रीफळ व पंचवीस हजार रुपये बिदागी देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी कुस्ती फडाचे व बक्षिस पुकारण्याचे व सूत्रसंचलन यात्राकमेटी कार्याध्यक्ष रामू पाटील कदम, ओझर सोसायटी माजी अध्यक्ष प्रशांत पगार, सुरेश कदम  यांनी केले.
तसेच ओमकोचे अध्यक्ष राजेंद्र शिंदे यांच्या तर्फे अकरा हजार रुपयांची कुस्ती इंद्रजीत शिंदे मनमाड व सैफ अली पंजाबी मालेगांव यांच्यात लावली यात सैफ अलीने इंद्रजित शिंदेला चितपट करून अकरा हजाराचे बक्षिस जिंकले, पंच म्हणून महेश शेजवळ यांनी काम पाहिले. तर प्रकाश शिवले यांनी त्यांचे वडील गंगाधर शिवले यांच्या स्मरणार्थ  एकवीस हजार रुपयांची सैफ अली पंजाबी मालेगांव व देवा टेकनल यांची कुस्ती लावली यात सैफ अली पंजाबी याने देवा टेकनल याला चितपट केले, सैफ अली पंजाबी मालेगांव याने बत्तीस हजाराच्या दोन कुस्त्यां जिंकल्या.अर्जुन शेजवळ यांच्या स्मरणार्थ अकराशेची व काही वैयक्तीक कुस्त्या लावण्यात आल्या यात्रा कमेटीने २५ हजार रुपयांची शेवटची कुस्ती लावण्यात आली. माजी आमदार अनिल कदम शेवटपर्यंत कुस्त्यांच्या फडात हजर होते. यावेळी कुस्त्याच्या फडात काही होऊ नये म्हणून यात्रा कमेटी, पंच, व पोलीस यंत्रणा दक्षता घेत होते.  यावेळी अध्यक्ष धनंजय पगार, कार्याध्यक्ष रामू पाटील, खजिनदार प्रशांत चौरें, सहखजिनदार अशोक शेलार, उपाध्यक्ष शिवाजी शेजवळ, संजय भडके,परशराम शेलार, संघटक पराग बोरसे, सतीष पगार,, किशोर त्रिभुवन, कामेश शिंदे, सहसंघटक राजेंद्र शेवाळे, कांचन जाधव, हरिभाऊ पगार, सचिन शिवले, चिटणीस उमेश देशमुख, दत्तात्रय घोलप, विलास काळे, नवनाथ चौधरी बापू चौधरी, विठ्ठल नाना कर्पे, भारत गाडेकर, अविनाश आंबेकर, अक्षय गांगुर्डे, भारत शेजवळ, बाळासाहेब आहेर, संजय शिंदे ,संजय देवकर, भगवान भागवत, नितीन काळे, राजाभाऊ शिंदे, प्रदिप शिदे, रावसाहेब शेजवळ, भाऊराव कदम, सुनिल चौधरी, तर पंच म्हणून शरद कर्पे बाळू चौधरी  प्रदिप अहिरे परशराम शेलार शामराव कदम  संदिप कर्पे किशोर त्रिभुवन, विजय कदम, कांचन जाधव, , पिंटू शिंदे, हेमंत जाधव, कामेश शिंदे, कुंदन कदम, प्रशांत पगार विनोद जाधव अरूण लोहकरे महेश शेजवळ, हरिभाऊ क्षीरसागर आदिंनी काम पाहिले.  कुस्ती फडात पोलीस यंत्रणा सज्ज होती.ओझर पोलीस ठाणेचे पोलीस उपनिरीक्षक बालकदास बैरागी कर्मचारी दिपक गुंजाळ तुकाराम वारे, रमेश चव्हाण, झांब्रु सुर्यवंशी, प्रसाद सुर्यवंशी, अमोल सुर्यवंशी, एकनाथ हळदे, विजय गायकवाड, योगेश भावनाथ, अमोल केदारे, देविदास डगळे, सुनिल मोरे, पारधी त आदिंनी बंदोबस्त ठेवला.
उपस्थितांनी घेतला कुस्तीचा आनंद…
माजी आमदार अनिल कदम ओमको चेअरमन राजेंद्र शिंदे माजी सरपंच संजय कुऱ्हाडे महेश गाडगे नंदकुमार कदम या राजकीय पटलावरच्या वेगवेगळ्या पक्षाचे काम करणाऱ्यांनी देखील शेवट पर्यंत कुस्ती स्पर्धेचा आनंद घेत उपस्थित पैलवानांना उस्फूर्त प्रतिसाद दिला.

हेही वाचा:

The post नाशिक : खंडेराव महाराज यात्रेनिमित्त दीड लाखाच्या कुस्त्या  appeared first on पुढारी.