नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी आपतर्फे ‘ढोल बजाव’

AAP www.pudhari.news

जुने नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांसमोर आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नाशिक मनपा स्टाईलमधे ढोल बजाव आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आठ दिवसांच्या आत शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविली नाहीत तर संबंधित मनपा अधिकारी यांच्या घराबाहेर ढोल वाजवू, असा इशारा आंदोलनप्रमुख माजिद पठाण यांनी यावेळी दिला. अशोका मार्ग आणि वडाळा रोडवर झालेल्या या आंदोलनप्रसंगी आम आदमी पार्टीचे मध्य विधानसभा अध्यक्ष ॲड. प्रभाकर वायचळे, पदाधिकारी, चंदन पवार, आदित्य पवार, नितीन भागवत, बंडूनाना डांगे, शैलेंद्र सिंग, दिपक सरोदे, प्रमोदिनी चव्हाण, सादिक अत्तार, नदीम शेख, अमोल लांडगे, अल्ताफ शेख, अनिल कौशिक, अमर गांगुर्डे, प्रदीप लोखंडे, मुझाईद शेख, तन्वीर अन्सारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

ज्या प्रमाणे थकबाकीदारांच्या घरासमोर जाऊन त्यांचा अनादर करत मनपाचे अधिकारी ढोल वाजवून करवसुली करीत आहेत. त्याचप्रमाणे आम्ही ढोल वाजवून सर्वसामान्यांच्या समस्या महापालिका प्रशासनासमोर समोर आणण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. कर वसुलीसाठी नागरिकांच्या घरासमोर जाऊन अधिकारी ढोल बडवीत आहेत. महापालिका अशाप्रकारे मोहीम राबविण्याचा अधिकार ठेवू शकत असेल तर जनतेलाही तसा अधिकार आहे. जिथे कचरा, खड्डे यासारख्या समस्या आहेत आणि जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करीत नाहीत, त्या अधिकाऱ्यांच्या घरासमोर आता आम आदमी पार्टी ढोल बडवणार आहे, असा इशारा आंदोलकांकडून मनपा अधिकाऱ्यांना देण्यात आला.

हेही वाचा:

The post नाशिक : खड्डे बुजविण्यासाठी आपतर्फे ‘ढोल बजाव’ appeared first on पुढारी.