नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल

देवळा : पुढारी वृत्तसेवा

खालप ता देवळा येथील सरपंचाच्या विरोधात सोमवारी दि १० रोजी तहसीलदारांकडे दोन विरुद्ध नऊ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या प्रकारामुळे खालप गावात खळबळ उडाली असून,सात दिवसांच्या आत या ठरावावर शिक्कामोर्तब केले जाणार आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की ,खालप ता देवळा येथील सरपंच मनीषा वसंत सूर्यवंशी हे इतर सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असून, या गैर कारभाराला कंटाळून त्यांच्या विरोधात नऊ सदस्यांनी काल सोमवारी दि १० रोजी तहसील कार्यालयात अविश्वास ठराव दाखल केला. यात ग्रामपंचायत सदस्य विमलबाई सूर्यवंशी , विजया देवरे, बेबीबाई सूर्यवंशी, कांताबाई पिंपळसे, हिरामण पवार, संतोष भामरे, मुरलीधर आहिरे, सुनील सूर्यवंशी, बाजीराव सूर्यवंशी या नऊ सदस्यांचा समावेश आहे. खालप ग्रामपंचायतीच्या एकूण ११ सदस्यांपैकी ९ सदस्यांनी अविश्वास प्रस्तावावर आपल्या स्वाक्षरी केल्या आहेत.

गेल्या दोन वर्षात सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज केले आहे, कुठल्याही प्रकारचा मनमानी कारभार केला नाही . चांगले काम विरोधकांच्या डोळ्यात खुपसते. – मनीषा वसंत सूर्यवंशी, सरपंच, खालप ग्रामपंचायत.

हेही वाचा:

The post नाशिक : खालप सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल appeared first on पुढारी.